Budhaditya Rajyog In Mithun : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह विशिष्ट अंतराने इतर ग्रहांशी संयोग करतात; ज्याचा मानवी जीवनावर थेट परिणाम होत असतो. यावेळी बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा संयोग १५ जून रोजी मिथुन राशीत तयार होईल. त्यामुळे बुधादित्य राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु, काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच या लोकांची करिअर आणि बिझनेसमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. चला जाणून घेऊ या कोणत्या राशी आहेत…
मिथुन
बुधादित्य राजयोग मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमची लोकप्रियता वाढेल. तुमचा समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. या राजयोगाच्या निर्मितीमुळे मिथुन राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती होईल. काही काळ प्रलंबित असलेली कामेही पूर्ण होतील. अनेक नवीन ‘डील’ मिळाल्याने व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. या काळात अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळविण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात सूर्यदेवाच्या प्रभावामुळे तुम्हाला अनेक नवीन आर्थिक स्रोत उपलब्ध होतील. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तिथल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तसेच, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी मिळू शकते.
कन्या
बुधादित्य राजयोगाची निर्मिती कन्या राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते. याव्यतिरिक्त तुम्हाला व्यवसायात भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळेल; तर नोकरदार लोकांना आर्थिक लाभ मिळेल आणि पदोन्नतीदेखील मिळू शकेल. मीडिया, राजकारण, बँकिंग व गणित या क्षेत्रांशी संबंधित असलेल्यांना या काळात चांगला लाभ मिळू शकतो.