Budhaditya Rajyog 2025 : ज्योतिषशास्त्रात राजयोगाला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हे शुभ योग तयार होतात तेव्हा त्याच्या जीवनात प्रगती, संपत्ती व सन्मानाच्या संधींचा वर्षाव होतो. या वर्षी १४ जानेवारी २०२५ रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर नऊ दिवसांनी म्हणजेच २४ जानेवारी २०२५ रोजी ग्रहांचा राजकुमार बुधदेखील मकर राशीत प्रवेश करील. पंचांगानुसार ग्रहांचा हा संयोग केवळ शुभच नाही, तर राजयोगही मानला जातो. अशा स्थितीत ग्रहांच्या या संयोगामुळे मकर राशीत बुधादित्य राजयोग तयार होईल. या योगाचा सर्व १२ राशींवर प्रभाव पडणार आहे. पण, या तीन राशी अशा आहेत की, त्या राशींच्या लोकांना हा राजयोग खास आणि लाभदायक ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधादित्य राजयोग ‘या’ राशींसाठी ठरेल फलदायी, मिळेल बक्कळ पैसा

तूळ

बुधादित्य राजयोग तूळ राशीच्या लोकांना फलदायी ठरू शकतो. या काळात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे दिवस येतील. तुम्ही घर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करू शकता. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुम्ही मालमत्ता, रिअल इस्टेट किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असाल, तर तुम्हाला या काळात लाभ मिळू शकतात. पैशाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावादेखील मिळू शकतो. तुम्हाला प्रत्येक कामात कुटुंबीयांची पूर्ण साथ आणि आशीर्वाद मिळू शकतो.

मकर

बुधादित्य राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ ठरू शकतो. या काळात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. समाजात तुमचा आदर आणि ओळख वाढेल. तुमच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ होईल. विवाहित लोकांचे नाते अधिक घट्ट होईल. लग्नाची वाट पाहणाऱ्यांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. तुमच्या अनेक इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकतात.

२१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे झटक्यात पालटणार नशीब; मंगळ मार्गीमुळे मिळणार बक्कळ पैसा, संपती, जबरदस्त यश

धनू

बुधादित्य राजयोग धनू राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरेल. या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी हा शुभ काळ आहे. जुने आर्थिक प्रश्न सुटू शकतात. यावेळी तुम्ही चांगली बचत करू शकाल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budhaditya rajyog 2025 after 24 january surya and mercury conjunction will form budhaditya rajyog these horoscope zodiac sign will get happiness earn more money sjr