Budhaditya Raj Yog In Kundli: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहाशी युती करतो किंवा त्याचा संबंध येतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. सिंह राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. बुध ग्रह आणि सूर्य यांच्या युतीमुळे ही निर्मिती होत आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांना या काळात चांगला नफा होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ: बुधादित्य योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीत दशम भावात बुधादित्य योग तयार होत आहे. ज्याला फील्ड आणि जॉबची जाण समजली जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायात नवीन ऑर्डर्स आल्याने चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण झाल्यामुळे व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. या काळात तुम्ही रुबी घालू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आणखी वाचा : हस्तरेषा शास्त्रानुसार, अशा लोकांचे लग्न झाल्यानंतर नशीब चमकतं, तुम्हीही तपासून पाहा

तूळ: बुद्धादित्य राजयोग बनल्याने तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये निराशाजनक यश मिळू शकते. कारण तुमच्या राशीवरून ११ व्या स्थानात बुधादित्य राजयोग तयार होत आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. तसेच, तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे पैसे कमवू शकाल. या काळात तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकता. तसेच, तुम्ही मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर यावेळी तुम्ही चांगला नफा कमवू शकता. यावेळी तुम्ही पिरोजी स्टोन घालू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते.

आणखी वाचा : Chanakya Niti: जीवनात या गोष्टींना पाय लावू नका, आनंदाला लागेल गालबोट

वृश्चिक : बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीत दशम भावात बुधादित्य राजयोग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याला व्यवसाय आणि नोकरीचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तसेच, तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते.

यावेळी तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. राजकारणात सक्रिय असाल तर राजकारणातही चांगले यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी हव्या त्या ठिकाणी बदली होऊ शकते. यावेळी तुम्ही पन्ना रत्न धारण करू शकता, जे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budhaditya rajyog made in leo these zodiac sign can be more profit prp