Budhaditya Raj Yog In Horocope: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहासोबत राशी परिवर्तन करतो किंवा युती करतो , तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. कन्या राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. बुध ग्रह आणि सूर्य यांच्या युतीमुळे ही निर्मिती होत आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांना या काळात चांगले पैसे आणि करिअरमध्ये यश मिळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनु: बुधादित्य राजयोग बनल्याने करिअर आणि व्यवसायात भरीव यश मिळू शकते. कारण गोचर कुंडलीतून दहाव्या घरात बुधादित्य योग तयार होणार आहे. ज्याला कार्यक्षेत्र आणि नोकरीचे स्थान मानलं जातं. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायात नवीन ऑर्डर आल्याने चांगला फायदा होऊ शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण झाल्यामुळे व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात सक्रिय असाल तर यश मिळू शकते. या काळात तुम्ही पुष्कराज घालू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आणखी वाचा : Chanakya Niti : वाईट काळ टाळायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा! नेहमी यश मिळेल

वृश्चिक: बुद्धादित्य राजयोग बनल्याने तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये निराशाजनक यश मिळू शकते. कारण बुधादित्य राजयोग तुमच्या राशीतून ११ व्या स्थानात असणार आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढण्याची अपेक्षा आहे. यासोबतच तुम्ही उत्पन्नाच्या नवीन माध्यमांतून पैसे कमवू शकाल. या काळात तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकता. तसेच तुम्ही मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर यावेळी तुम्ही चांगली कमाई करू शकता. यावेळी तुम्ही नीलमणी रत्न घालू शकता, जो तुमच्यासाठी लकी स्टोन ठरू शकतो. यावेळी तुम्हाला कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.

आणखी वाचा : Chanakya Niti: जर आयुष्यात यश मिळत नसेल तर या ५ गोष्टी तुमचे नशीब बदलू शकतात

सिंह: बुधादित्य राजयोग बनून तुम्ही तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकता. कारण तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ज्याला पैसा आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच कर्ज परत मिळू शकते. दुसरीकडे जर तुम्हाला शेअर बाजार आणि सट्टा लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकता. लाभाची शक्यता आहे.

जर तुमचे कार्य क्षेत्र भाषणाशी संबंधित असेल (शिक्षक, मार्केटींग, संगीत), तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगती होऊ शकते. दुसरीकडे जे राजकारणाशी निगडीत आहेत, त्यांना ही वेळ यशस्वी ठरू शकते. या काळात तुम्ही रुबी स्टोन घालू शकता. जे तुमच्यासाठी लकी ठरू शकतात.