Budhaditya Rajyog In Kumbh: ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो. त्या व्यक्तीला समाजात मान-प्रतिष्ठा मिळते. सूर्य ग्रह सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे आणि २७ फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे अत्यंत शुभ बुद्धादित्य राजयोग तयार होईल. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा तीन राशी आहेत, ज्यांच्यासाठी या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मकर राशी

बुधादित्य राजयोग तुमच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात तयार होईल. त्यामुळे यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. यासोबतच नशीबही तुमच्यासोबत असू शकते. त्याच वेळी, या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. त्याचबरोबर अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी जोडलेला आहे त्यांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो. याकाळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. यासोबतच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. तसेच हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. दुसरीकडे, नोकरदार लोकांच्या पगारवाढ होऊ शकते. बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. दुसरीकडे, जर तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला काही पद मिळू शकते.

( हे ही वाचा: ‘शश महापुरुष राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? ९ मार्चपासून मिळू शकतो बक्कळ पैसा)

सिंह राशी

बुधादित्य राजयोग तयार झाल्याने सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीतून सप्तम भावात तयार होत आहे. त्यामुळे या वेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात नफा मिळू शकतो. यासोबतच जोडीदारासोबतचे नाते सुधारेल. त्याचबरोबर अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. त्याच वेळी, एक मोठा व्यवसाय करार अंतिम केला जाऊ शकतो. ज्यामध्ये लाभाचे योग तयार होत आहेत. मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

(वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

Story img Loader