Budhaditya Rajyog In Makar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ आणि अशुभ योग निर्माण करत असतात. ज्याचा मानवी जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. फेब्रुवारीच्या सुरुवातीला मकर राशीमध्ये अतिशय शुभ बुद्धादित्य राजयोग तयार होणार आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसेल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांना या काळात आर्थिक लाभ आणि मान-सन्मान मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..
धनु राशी
बुधादित्य राजयोगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच, आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा यावेळी चांगली असेल. उत्पन्नातही वाढ होईल. यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते. तसेच जर तुम्ही मीडिया, फिल्म लाइन, फॅशन डिझायनिंग आणि कपड्यांचा व्यवसाय करत असाल. तर येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असू शकतो.
मीन राशी
बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी उत्पन्नाच्या दृष्टीने चांगला सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या पारगमन कुंडलीच्या अकव्या घरात हा योग तयार होणार आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच हा काळ गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चांगला असू शकतो. जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा मिळण्याची शक्यता दिसत आहे. दुसरीकडे राजकारणाशी संबंधित असलेल्यांना काही पद मिळू शकते.
(हे ही वाचा: १४ दिवसांनी ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? शनिच्या राशीत शुक्र प्रवेश करताच मिळू शकतो प्रचंड पैसा)
वृषभ राशी
बुधादित्य राजयोग तयार होताच तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीतून नवव्या भावात तयार होणार आहे.जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे, नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच, राजकारणाशी निगडित लोकांसाठी हा काळ चांगला आहे. त्याचा समाजात आदर वाढेल.
(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)