Cancer Annual Horoscope 2025: कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचा अंमल विशेषतः मनावर असतो. त्यामुळे शांती, प्रसन्नता, उत्साह हे चंद्राचे गुण कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये आढळतात. चंद्राची चंचलता आपल्यात दिसून येते. आपण क्षणात हसाल, तर क्षणात डोळ्यांत टचकन पाणी येईल. समूहात राहणे, कुटुंबात रमणे आपल्याला खूप आवडते. आपल्यात सहनशीलता दिसून येते. कल्पकता, संवेदनशीलता हे आपले विशेष गुण आहेत. तसेच करारीपणा आणि राजकारणी वृत्ती हीदेखील आपल्या स्वभावातील एक विशेष छटा आहे. अशा या कर्क राशीसाठी २०२५ हे वर्ष कसे असेल ते पाहू…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्क राशीच्या दृष्टीने वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशिबदल असे आहेत. १८ मार्चला हर्षल दशमातील मेष राशीतून लाभातील वृषभ राशीत प्रवेश करेल. २९ मार्चला शनी अष्टमातील कुंभ राशीतून लाभातील मीन राशीत प्रवेश करेल. १४ मे राजी गुरू लाभातील वृषभ राशीतून व्यय स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. तर, २९ मे रोजी राहू व केतू वक्र गतीने अनुक्रमे अष्टमातील कुंभ राशीत आणि द्वितीय स्थानातील सिंह राशीत प्रवेश करतील.

कर्क राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? जाणून घ्या (Cancer Yearly Horoscope 2025)

जानेवारी (January Horoscope 2025) :

आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणे हा आपला स्थायीभाव असल्याने अडचणींतून मार्ग काढत पुढे जाल. नववर्षाचे स्वागत उत्साहात कराल. गुरुबल चांगले असल्याने हिंमत वाढेल. विद्यार्थिवर्गाला कंबर कसून मेहनत घ्यावी लागेल. आपल्यात केलेले बदल मकर संक्रांतीदरम्यान विशेष लाभकारक ठरतील. नोकरी-व्यवसायात काहीसे अनाकलनीय वातावरण निर्माण होईल. विवाहोत्सुकांचे विवाह योग सुरू आहेत; पण शनी यात अडथळे आणेल. तरीदेखील प्रयत्न सोडू नका. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांना समजून घेण्याचे दिवस आहेत. जोडीदाराच्या विचारांचा आणि भावनांचा मान ठेवाल. गुंतवणुकीत मोठी जोखीम स्वीकारू नका. आरोग्यविषयक तक्रारी हळुवार हाताळाल.

फेब्रुवारी (February Horoscope 2025) :

विचारांचा भावनांवर, संवेदनांवर परिणाम होत असतो याची प्रचिती या महिन्यात येईल. विचार सकारात्मक ठेवल्यास अडचणीतूनही मार्ग शोधता येईल. विद्यार्थ्यांनीदेखील हे तत्त्व स्वीकारले, तर अभ्यासात प्रगती कराल. परीक्षेचा ताण येणार नाही. नोकरी-व्यवसायात नव्या ओळखी लाभकारक ठरतील. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. परदेशगमनाचा योगसुद्धा येईल. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. मित्रमंडळींमार्फत नव्याने ओळखी होतील. नाते जुळेल. विवाहितांना संततीप्राप्तीचे योग आहेत. वैद्यकीय सल्ला उपयोगी ठरेल. महाशिवरात्रीला आनंदाची बातमी समजेल. नवे करार होतील. घर, प्रॉपर्टी यांची कामे वेग घेतील. कागदपत्रांची तपासणी करावी. गुंतवणूकदार शिखर गाठतील. अभ्यासपूर्वक गुंतवणूक यशस्वी ठरेल. कफ, खोकला यांनी बेजार व्हाल.

मार्च (March Horoscope 2025):

गोष्टी मनाजोगत्या घडून येतील असा हा महिना असेल. त्यामागे आपली प्रचंड मेहनत आणि ओढ असेल. विद्यार्थिवर्ग ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. गुरुबल चांगले असल्याने कष्टाचे चीज होईल. १८ मार्चला हर्षल लाभ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. कला आणि तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालाल. होळीमध्ये वाईट विचार, नकारात्मक भावना यांचे दहन कराल; तर रंगपंचमी नवे रंग घेऊन येईल. नोकरी-व्यवसायात नवी दालने खुली होतील. विवाहोत्सुकांचे विवाह जमण्यास अनुकूल ग्रहमान आहेत. प्रयत्न सुरू ठेवावेत. यश मिळेल. २९ मार्चला शनी भाग्यस्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. रेंगाळलेल्या गोष्टी मार्गी लागतील. गुढीपाडव्याला जोडीदारासह समृद्धीची गुढी उभाराल. एकमेकांचे सूर जुळतील. गुंतवणूक
करताना हलगर्जीपणा नको.

एप्रिल (April Horoscope 2025) :

मानसन्मान आणि प्रसिद्धी देणारा असा हा महिना असेल. आपल्या कामाची आणि कष्टाची कदर केली जाईल. विद्यार्थिवर्गाला आत्मविश्वास वाढवावा लागेल. अभ्यासाबरोबरच सराव आणि विचारांतील ठामपणा गरजेचा आहे. नोकरी-व्यवसायात आलेले पेचप्रसंग व्यवहारीपणाने सोडवाल. दशमातील उच्च स्थानाचा रवी कर्तृत्वात भर पाडेल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची पोचपावती मिळेल. विवाहोत्सुकांना गुरुबल चांगले असल्याने विवाह योग जुळतील. परिचित व्यक्तींकडून स्थळ समजेल. विवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल. लहान-मोठे प्रवास कराल. घर, जमीनजुमला यासंबंधीची न्यायालयीन कामे थोडी पुढे सरकतील. गुंतवणूकदारांची अक्षय्य तृतीया भरभराटीची असेल. अतिरिक्त उष्णतेमुळे डोळे आणि घसा यांचे आरोग्य जपावे लागेल.

मे (May Horoscope 2025) 

संमिश्र अनुभव देणारा आणि आपल्याच माणसांची नव्याने ओळख करून देणारा असा हा महिना असेल. विद्यार्थिवर्गाने अभ्यासासह कलागुणांना आणि छंदाला वाव द्यावा. परदेशातील शिक्षणासंबंधित बाबींना चालना मिळेल. बुद्ध पौर्णिमेला एखाद्या सत्कर्मामुळे मनाला शांती मिळेल. १४ मे रोजी गुरू व्यय स्थानातील स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. २९ मे रोजी राहू अष्टमात कुंभ राशीत आणि केतू द्वितीयात सिंह राशीत प्रवेश करेल. नोकरी-व्यवसायातील प्रश्न अनुत्तरित राहतील. विवाहित दाम्पत्यांमध्ये गैरसमज झाल्यास मोकळेपणाने चर्चा करून, तो दूर करावा. घराचे व्यवहार लांबणीवर पडतील. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी. त्वचाविकार उदभवतील. श्वसनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको.

जून (June Horoscope 2025) :

गुरुबल कमजोर असल्याने साध्या सरळ गोष्टीदेखील उशिरा पूर्ण होतील; पण भाग्यातील शनी साह्यकारी ठरेल. विद्यार्थिवर्गाने कसून मेहनत घ्यायची तयारी ठेवावी. नोकरी-व्यवसायात स्वतःला सिद्ध करावे लागेल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांना आपली योग्यता दाखवून द्याल. वटपौर्णिमेच्या आसपास आशेचे किरण दिसतील. विवाहितांनी जोडीदाराच्या विचारांचा मान राखावा. घर, प्रॉपर्टी, जमीनजुमला यांबाबतची कागदपत्रे तयार ठेवावीत. अतिशय धीम्या गतीने या गोष्टी पुढे सरकतील. मित्रमंडळी आणि भावंडांना मदत कराल. खरे तर त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांना दिलेला शाब्दिक आधारदेखील त्यांना लाखमोलाचा वाटेल. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम घेऊ नये. कान, नाक, घसा यांचे विकार बळावतील. वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावे लागतील.

जुलै (July Horoscope 2025) :

वातावरणातील बदल काहीसा उमेद वाढवणारा असेल. आषाढी एकादशी उत्साह घेऊन येईल. विद्यार्थिवर्गाने वर्षाच्या सुरुवातीपासूनच वेळापत्रक आखून, त्याचे पालन करावे. गुरुपौर्णिमेदरम्यान गुरुजनांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायानिमित्त लहान-मोठे प्रवास कराल. लोकांच्या ओळखी, भेटी आर्थिकदृष्ट्या लाभकारक ठरतील. समस्या, प्रश्न सोडविताना भावनेच्या आहारी न जाता, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. विवाहित दाम्पत्यांना कुटुंबासाठी वेळ राखून ठेवावा लागेल. सामाजिक बांधिलकी जपणे महत्त्वाचे ठरेल. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक लाभदायक असेल. दीर्घकालासाठी विचार केल्यास अधिक फायदा होईल. पित्ताच्या त्रासावर ठोस उपाय करणे अतिशय गरजेचे
आहे.

हेही वाचा: Gemini Yearly Horoscope 2025 : मिथुन राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? प्रगतीचे मार्ग मोकळे, प्रत्येक कामात यश, पण गुंतवणूकदारांनो सावध; वाचा वर्षाचे राशीभविष्य

ऑगस्ट (August Horoscope 2025) :

वैचारिक गोंधळ व समस्या थोड्या बाजूला सारून, सणवार साजरे करण्यात उत्साह वाढेल. विद्यार्थिवर्गाला अभ्यासाव्यतिरिक्त कला, क्रीडा व तंत्रज्ञान यांत अधिक रस वाटेल. प्रलोभनांना वेळीच आवर घाला. नोकरी-व्यवसायात नारळी पौर्णिमा ते जन्माष्टमी या कालावधीत विशेष लाभ होईल. अपेक्षित बातमी कळेल. उच्च पद भूषवाल. संततीप्राप्तीचे योग तितकेसे बलवान नाहीत. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांना समजून व सांभाळून घेतल्यास दोघांच्या समस्यांवर उकल सापडेल. घर, वाहन व इस्टेट यांबाबत विषय काढणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल. त्यामुळे सध्या तरी मौन राखावे.परदेशासंबंधित कामांचा पाठपुरावा करावा लागेल. श्री गणेशाच्या आगमनाने पुन्हा एकदा नवचैतन्य येईल. आरोग्यदायक महिना जाईल

सप्टेंबर (September Horoscope 2025) :

मरगळ झटकून आगेकूच करणारा असा हा महिना समाधान देणारा असेल. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय लाभदायक ठरतील. विद्यार्थिवर्गाने घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. हिंमत आणि आत्मविश्वास वाढल्याने उमेद निर्माण होईल. नोकरी व्यवसायात बदलाचा स्वीकार करण्याची तयारी दाखवाल. ही गोष्ट आपल्यासाठी उत्कर्षकारक ठरेल. गुरुबल कमजोर असल्याने विवाहोत्सुकांना वाट बघावी लागेल. विवाहित दाम्पत्यांसाठी पितृपक्षात केलेले दान वा समाजकार्य वरदान ठरेल. घर, जमीन, वाहन यांचे व्यवहार जपून करावेत. नवरात्रीचा कालावधी आनंदात जाईल. नवचैतन्य फुलेल. प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढेल.

ऑक्टोबर (October Horoscope 2025) :

२ ऑक्टोबरला येणारा दसरा आनंद आणि उत्साह घेऊन येईल. कामाचा व्याप वाढेल. पण, जबाबदाऱ्या पार पाडताना मनाला समाधान वाटेल. विद्यार्थिवर्गासाठी परीक्षा हे स्वतःला सिद्ध करून दाखविण्याचे एक प्रभावी माध्यम ठरेल. एकाग्रतेने अभ्यास कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाखमोलाचे ठरेल. १८ ऑक्टोबरला गुरू आपल्या कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल चांगले मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. विवाहित मंडळींना जोडीदाराचा भक्कम आधार मिळेल. कौटुंबिक जबाबदारी हिमतीने पार पाडाल. घर, प्रॉपर्टीची कागदपत्रे तज्ज्ञांकडून तपासून घ्यावीत. कायदेशीर कार्यवाही करण्यात विलंब करू नका. गुंतवणूकदारांना मिळणारे लाभ मध्यमानात असतील. दिवाळी उत्साह आणि आनंद देणारी ठरेल. आप्तांच्या भेटीगाठी संमिश्र अनुभव देतील.

नोव्हेंबर (November Horoscope 2025) :

एकंदरीत वर्षभराचा आढावा घेणारा हा महिना असेल. कोणाची देणी-घेणी बाकी ठेवू नका. गुरुबल चांगले असल्याने रेंगाळलेल्या कामांना चालना मिळेल. ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. विद्यार्थिवर्गाची चंचलता वाढेल. त्यांना प्रयत्नपूर्वक अभ्यासावर मन एकाग्र करावे लागेल. उच्च शिक्षणासाठी पुढील प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात मिळणारी चांगली संधी दवडू नका. स्वतःहून प्रयत्न केलेत, तर यश नक्की मिळेल. विवाहितांनी टोकाची भूमिका घेऊ नये. कुटुंबातील ज्येष्ठांचा आधार वाटेल. देवदिवाळी ते चंपाषष्ठी यादरम्यान जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. ओळखीचा फायदा होईल. गुंतवणूकदारांना धोक्याची सूचना… अतिरिक्त आत्मविश्वास चांगला नाही. थोडा धीर धरावा. पोट, आतडी, गर्भाशय यासंबंधात तक्रारी निर्माण
होतील.

डिसेंबर (December Horoscope 2025) :

महिन्याच्या सुरुवातीलाच श्री दत्तजयंती यशकारक आणि उत्साहवर्धक बातमी देईल. ५ डिसेंबरला गुरू वक्र गतीने मिथुन राशीत प्रवेश करेल. खडतर प्रसंगातून प्रवास कराल. विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. नोकरी-व्यवसायात कामावरची पकड थोडी ढिली होईल. मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाची कामे मात्र लांबणीवर पडतील. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांचा सहवास लाभेल. तो सुखावह असेल. जमिनीचे कामकाज बघताना भावनेच्या आहारी जाऊ नका. व्यवहाराच्या जागी व्यवहारी असणे हाच खरा व्यवहार आहे हे ध्यानात असू द्यावे. गुंतवणूकदारांना योग्य निर्णय घेता येईल. नफा झाला नाही तरी मोठा तोटा टळेल. हीदेखील खूप महत्त्वाची आणि मोठी बाब आहे.

एकंदरीत २०२५ हे वर्ष शनीची साथ मिळणारे असेल; पण गुरुबल संमिश्र असेल. १४ मे रोजीपर्यंत गुरुबल असलेल्या कालावधीत महत्त्वाच्या कामांना गती मिळाली, तर वर्षभर त्याचे लाभ मिळतील. मोठी जोखीम स्वीकारणे या वर्षात हिताचे ठरणार नाही. खूप मोठा पल्ला गाठला नाहीत तरी आहे ते राखणे महत्त्वाचे आहे. हा मोलाचा सल्ला ध्यानी असावा. वर्षभरात अनेक लहान-मोठ्या आनंदी क्षणांचा भरभरून अनुभव घ्याल.