Astrology Today: आज ५ फेब्रुवारी २०२५ (बुधवार) रोजी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी असून आज भरणी नक्षत्र जागृत असेल. आजचा राहूकाळ दुपारी १२ ते दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. आज माघ महिन्यातील नवरात्रीमधील दुर्गाष्टमीचा दिवस आहे. तसेच आज भीमाष्टमीदेखील आहे. त्यामुळे आजचा दुर्गाष्टमीचा शुभ दिवस कोणत्या राशीसाठी अधिक शुभ असेल हे आपण जाणून घेऊ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्क राशीच्या व्यक्तींना कसा जाईल आजचा दिवस (How will today be for Cancer people?)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप आनंदात आणि उत्साहात जाईल. नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नवे लोक, मित्रमैत्रिणी भेटतील. तुमच्यातील उत्साह तुम्हाला यश मिळवून देईल. नोकरीत यश मिळेल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. मुलांच्या आनंदात रमून जाल. नवीन विषयात रुची दाखवाल. करमणुकीचे कार्यक्रम पहायला जाल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण भाग्योदय करणारे आहे. कोणाच्या मागे लागण्याची गरज भासणार नाही. कामे अगदी वेळेत पूर्ण होतील. तुमचाही कामातील उत्साह वाढेल. प्रकृती ठणठणीत राहील.

कर्क राशीचे आजचे आर्थिक राशिभविष्य (Astrology Predictions: Cancer Finance Horoscope Today)

आजच्या दिवशी आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आर्थिक लाभ होईल. लक्ष्मी प्रसन्न राहील.

कर्क राशीचे करिअरविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Cancer Career Horoscope Today)

आजच्या दिवशी राजकीय क्षेत्रातील तुमचा दरारा वाढेल. व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची शाब्बासकी मिळेल.

कर्क राशीचे आजचे प्रेमविषयाचे राशिभविष्य (Astrology Predictions: Cancer Love Horoscope Today)

कर्क राशीच्या व्यक्तींच्या प्रेमसंबंधांमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. आजचा दिवस तुमच्या जोडीदाराबरोबर व्यतीत कराल. नाते अधिक घट्ट होईल. परंतु जोडीदाराबरोबर बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा, नाहीतर गैरसमज होण्याची शक्यता आहे.