– सोनल चितळे
Cancer Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र जसा चंचल आणि भावनांशी निगडीत आहे तसेच कर्क राशीच्या व्यक्ती चंचल असतात. संवेदनशील आणि भावूक असतात. सहनशील, मायाळू अशा या व्यक्ती करारी व धोरणी देखील असतात. त्यांच्या मनाचा ठाव लागणे फार कठीण असते. कल्पना विश्वात रमणे, डौलात मिरवणे, हळवेपणाचा अतिरेक ,चिडचिडेपणा आणि लहानसहान गोष्टी मनाला लावून घेणे या त्यांच्यातील उणिवा असतात. काही वेळा मात्र आपल्याला हवी असलेली गोष्ट कोणत्याही मार्गाने मिळवण्याची त्यांची तयारी असते. अशा या कर्क राशीच्या मंडळींना २०२३ हे वर्ष कसे जाईल ते पाहू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यंदा १७ जानेवारीपर्यंत शनी आपल्या सप्तम स्थानातील मकर राशीत असेल. व्यवसायातील कामे पुढे सरकतील. जोडीदारासह लहान मोठे खटके उडतील. १७ जानेवारीला शनी आपल्या अष्टम स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. चिंता ,समस्या उदभवतील. २१ एप्रिलपर्यंत गुरू भाग्य स्थानातील मीन राशीत स्थित आहे. तोपर्यंत अडचणींवर मात करणे सहज शक्य होईल. पुढे २१ एप्रिलला गुरू आपल्या दशम स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. काही अंशी गुरुचे पाठबळ कमी होईल. अगदी साध्या सोप्या कामांसाठी अधिक वेळ, मेहनत आणि पैसा खर्च करावा लागेल. यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल दशमातील मेष राशीतूनच भ्रमण करणार आहे. यामुळे कामकाजात अचानक अडचणी येणे वा अनपेक्षित लाभ होणे हे संभवते. या हर्षलसह २८ नोव्हेंबरपर्यंत राहू देखील मेष राशीत असेल. २८ नोव्हेंबरला राहू भाग्य स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. कर्तृत्ववाला धैर्याची जोड मिळेल. मात्र कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगावीच
लागेल. अशा या महत्त्वाच्या ग्रहबदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत कर्क राशीचे वार्षिक ग्रहफल असे आहे…
जानेवारी :
षष्ठ आणि सप्तमातून असलेले रवीचे भ्रमण नोकरी व्यवसायासाठी संमिश्र फळ देईल. अधिकार देईल पण सोबत तणावाचे वातावरणही असेल. भाग्यातील गुरू मात्र साहाय्य करेल. विद्यार्थी वर्गाला अडचणीतून मार्ग काढता येईल. धीर सोडू नका. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतरसुद्धा गुरुमुळे मोठी आव्हाने पेलून धराल. लाभ स्थानातील मंगळ आर्थिकदृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यास प्रवृत्त करेल. मेहनत आणि सातत्य राखल्यास यश तुमचेच आहे. छातीच्या विकारांनी त्रस्त व्हाल. कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी कला जोपासाल.
फेब्रुवारी :
दशमातील राहू आणि हर्षलमुळे आपल्या कर्तृत्वाचे झेंडे फडकतील. कामात कुचराई नको. शुक्राचे भ्रमण भाग्यकारक ठरेल. धनसंपत्ती वाढेल. प्रवास लाभकारक ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीतील बदल हितकारक असेल. जोडीदाराच्या साथीने घेतलेले महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. विद्यार्थी वर्गाने उत्साहाने अभ्यासाला लागावे. गुरुचे पाठबल चांगले आहे. पाय दुखणे , श्वासाचा त्रास होणे यावर औषधोपचार घ्यावेत.
मार्च :
अष्टमतील रवी , शनीचे भ्रमण संभ्रम निर्माण करेल. निर्णय घेताना तारांबळ उडेल. भाग्यातील गुरू, शुक्र बलवान आहेत. त्यांच्या साहाय्याने मोठी मजल माराल. जोडीदाराला अडचणींचा सामना करावा लागेल. एकमेकांना समजून घेणे आवश्यक ! संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. नोकरी व्यवसायासाठी प्रवास कराल. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. कामाचा बोजा वाढेल. विद्यार्थी वर्गाने खचून जाऊ नये. धीर धरा. परीक्षा आता जवळ येत आहे. साथीजन्य आजारांपासून सावधगिरी बाळगा.
एप्रिल :
लाभ स्थानातील स्वगृहीचा शुक्र आर्थिक लाभ करून देईल. दशमातील उच्चीचा रवी अधिकारपद भूषवेल. त्याच्यासह राहू हर्षल असल्याने स्पर्धेला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. जोडीदाराची मनस्थिती समजून घ्यावी. २१ एप्रिलला* गुरू आपल्या दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. मुलांच्या समस्या सोडवताना भावनिक दृष्टिकोन बाजूला ठेवून विवेकी विचार करावा. हे मुलांच्याही फायद्याचे ठरेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
मे :
परिस्थितीला धीराने सामोरे जाल. भावनावश न होता व्यावहारिक दृष्टीने प्रश्न सोडवावे लागतील. सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील अशी अपेक्षा ठेऊ नका. नोकरी व्यवसायात कसोटीची वेळ येईल. विद्यार्थी वर्गाने स्पर्धात्मक परीक्षेसाठी मनापासून अभ्यास करावा. लाभ स्थानातील रवीचे भ्रमण मानसन्मान देईल. आर्थिक स्थिती सुधारेल. आत्मविश्वास बळावल्याने नव्याने आव्हान स्वीकाराल. जोडीदाराची साथ सोबत चांगली मिळेल. संतती प्राप्तीसाठी सबुरीने घ्यावे. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा.
जून :
आपल्या राशीतील मंगळ शुक्राचे भ्रमण रोजच्या जगण्याचा आनंद घ्यायला शिकवेल. नित्याच्या गोष्टीतही नावीन्य फुलवाल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात कठीण विषयांवर सुरुवातीपासूनच विशेष लक्ष केंद्रित करावे. नोकरी व्यवसायात करारी आणि धोरणी वृत्ती उपयोगी पडेल. व्यवसाय वृद्धीसाठी कालावधी चांगला आहे. अतिरिक्त खर्चावर आळा घालण्याची गरज भासेल. अन्यथा कितीही पैसा कमावलात तरी पुरे पडणार नाही. वेळीच खबरदारी घ्यावी. ज्वराचे निदान लवकर होणार नाही.
जुलै :
गुरू शुक्राचा शुभ योग हा कामातील प्रगती आणि आर्थिक उन्नती यांचा द्योतक आहे. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. लहान मोठे प्रवास आनंददायी होतील. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार सुरू ठेवावेत. जोडीदाराच्या विचारांना कृतीची जोड द्याल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने केलेली आर्थिक उलाढाल लाभकारक ठरेल. विद्यार्थी वर्गाला गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. प्रश्न सुटतील. कौटुंबिक सौख्य संमिश्र असेल. वातावरणातील बदलामुळे कफ, खोकला संभवतो.
ऑगस्ट :
धनलाभ, यश ,कीर्ती मिळण्याची चांगली संधी उपलब्ध होईल. आपल्या कामातून आपली योग्यता सर्वांना दाखवाल. विरोधकांना चीत कराल. हिमतीने पुढे व्हावे. ग्रहबल चांगले आहे. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. सावधगिरी बाळगावी. ‘आपण सरळ तर जग सरळ’ असे दिवस राहिलेले नाहीत. विद्यार्थी वर्गाला भाषण, सादरीकरण यात उत्तम यश मिळेल. आधीपासून केलेली तयारी नक्कीच उपयोगी पडेल. नेटाने पुढे जावे. जोडीदार त्याच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करेल. आरोग्य चांगले राहील.
सप्टेंबर :
धन स्थानातील रवी बुध योग ‘उत्पन्न आणि खर्चाचे योग्य गणित मांडण्याची गरज आहे’ असे सूचित करत आहे. मोठेपणा मिरवण्यासाठी खर्च कराल तर अंगाशी येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांचे मन राखणे गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर अधिक जोर लावावा लागेल. कष्ट घ्याल तरच मेवा खाल. काही मुद्द्यांवरून जोडीदारासह वाद होतील. शब्द जपून वापरावेत. अन्यथा प्रकरण विकोपाला जाईल. कामाचे ठिकाण आणि घर यात समतोल साधणे गरजेचे !
हे ही वाचा<<मेष राशीचे वार्षिक राशीभविष्य
ऑक्टोबर
गुरू शुक्राचा शुभ योग हा आपले सादरीकरण प्रभावी करेल. नोकरी व्यवसायानिमित्त होणारी सभा, संमेलने गाजवाल. इतरांवर आपली छाप पडेल. विद्यार्थी वर्गाला मन एकाग्र करण्याची गरज भासेल. आसपासच्या प्रलोभनांमुळे अभ्यासात व्यत्यय येईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विवाहोत्सुक मंडळींनी धीर धरावा. देशांतर्गत प्रवास कामी येतील. ऋतुचक्रातील बदल मानवणार नाही. तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारी उदभवतील.
नोव्हेंबर :
चतुर्थ स्थानातील रवी, मंगळ, केतू या तप्त ग्रहांमुळे कौटुंबिक वातावरण त्रस्त राहील. गुरू, शुक्राच्या साथीने संयम ठेवाल. अडचणी दूर करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक पाऊल उचलावे. अन्यथा अनपेक्षित संकटांना तोंड द्यावे लागेल. नोकरी व्यवसायात जुन्या ओळखीच्या व्यक्ती भेटतील. महत्वाची कामे हळूहळू मार्गी लागतील. विद्यार्थी वर्गाने स्वयंशिस्त बाळगावी. जोडीदार आणि नातेवाईक यांच्यासह जुळवून घ्याल. छाती आणि ओटीपोटाची काळजी घ्यावी.
हे ही वाचा<< वृषभ राशीचे वार्षिक राशीभविष्य
डिसेंबर :
२८ नोव्हेंबरला * राहूचा आपल्या भाग्य स्थानातील मीन राशीत प्रवेश होणार आहे. धैर्य मिळेल. अनेक अनाकलनीय गोष्टींची उकल होईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. नुकसानभरपाई मिळेल. कौटुंबिक वाद शांत होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाची दखल घेतली जाईल. जोडीदार त्याच्या कामकाजात अधिक व्यस्त असेल. एकमेकांची अडचण समजून घेण्यातच शहाणपणा आहे. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावरील पकड सैल करू नये. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. अपचनाचा त्रास वाढेल.
हे ही वाचा<< मिथुन राशीचे वार्षिक राशीभविष्य
२०२३ या वर्षात २१ एप्रिलपर्यंत गुरुबल चांगले व त्यानंतर मध्यम असेल. काही गोष्टी प्रयत्नपूर्वक साध्य कराव्या लागतील. विनासायास मिळणार नाहीत. नव्या आर्थिक वर्षात गुंतवणूक लाभदायक ठरेल. एप्रिल ते ऑक्टोबर आर्थिक लाभाचा आलेख उंचावेल. मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यासाठी काही करण्याची संधी मिळेल. परदेशगमनासंबंधी विशेष लाभ नाहीत. त्यासंबंधीचे काम झालेच तर एप्रिलच्या आधी होईल. भावंडांमधील वाद मिटतील. एप्रिल आणि नोव्हेंबर मध्ये दिलजमाई होईल. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत स्थावर मालमत्तेची कामे मार्गी लागतील. संबंधित खरेदी, विक्री किंवा कोर्ट कचेरी, कागदपत्रे यांच्या बाबतीत हालचाल सुरू होईल. आपल्यातील उणिवा ,कमतरता यांवर मात करण्यासाठी प्रयत्न कराल. अतिसंवेदनशीलतेवर अंकुश ठेवलात तर नाहक चिडचिड होणार नाही. तसेच हळवेपणा देखील नियंत्रणात राहील. असे झाल्यास २०२३ हे आनंदमयी वर्ष होईल.