Cancer Yearly Horoscope 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र आहेत ज्याचा व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर प्रभाव असतो. कर्क राशीच्या लोकांसाठी वर्ष २०२३मध्ये खूप चढ-उतार असलेले होते. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच लोकांवर शनीची ढैय्या (अडीच वर्ष) सुरू झाली होती. दुसरीकडे, १ जानेवारी २०२३ रोजी तुमच्या गोचर कुंडलीत ग्रहांची स्थितीमध्ये भाग्यस्थानी राहु ग्रह आला आहे, त्यामुळे तुमचे नशीब उजळेल. केतू ग्रह तुमच्या शौर्याच्या स्थानी आहे, ज्यामुळे तुमचे शौर्य वाढेल. तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. महिन्याच्या सुरुवातीला पाचव्या स्थानी लक्ष्मी नारायण योग तयार होईल. गुरु ग्रह कर्म स्थानी असून १ मे रोजी उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी प्रवेश करेल. सूर्य ग्रह सहाव्या स्थानी राहील, यामुळे शत्रूंचा नाश होईल. पण शनीदेव आठव्या स्थानी भ्रमण करत आहेत. त्यामुळे शनीची ढैय्या सुरू आहे ज्याचा तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनासाठी कसे असेल ते जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा