सोनल चितळे

Yearly Capricorn Astrology Prediction 2025 : मकर ही शनीची रास आहे. चिकाटी, मेहनत घेणे आणि विचारी वृत्ती हे शनीचे गुणधर्म मकर राशीच्या व्यक्तींमध्ये आढळतात. जीवनात काहीतरी मिळवण्याची जिद्द आपल्यात असते. नैराश्य, उदासीनतेने आपण लवकर ग्रासून जाता. आपल्यात सेवाभावी वृत्ती आहे, महत्वाकांक्षी विचार आहेत. बऱ्याचदा आपण जुन्या मतांना धरूनच पुढे जायची तयारी दाखवता. तर अशा या मकर राशीला २०२५ हे वर्ष कसे असेल हे आपण पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मकर राशीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत… १८ मार्चला हर्षल चतुर्थ स्थानातून पंचमातील वृषभ राशीत प्रवेश करेल. २९ मार्चला शनी द्वितीय स्थानातून तृतीयातील मीन राशीत प्रवेश करेल आणि साडेसातीचा शेवटचा टप्पा संपेल. ४ मे रोजी गुरू पंचमातून षष्ठातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमी होईल, पण एकंदरीत हितकारकच असेल. २९ मे रोजी राहू व केतू वक्र वतीने अनुक्रमे द्वितीयातील कुंभ राशीत व अष्टमातील सिंह राशीत प्रवेश करतील.

जानेवारी (January Horoscope 2025)

नव्या वर्षातील नव्या योजनांचा आराखडा आखता आखता २०२५ चे स्वागत कराल. येत्या वर्षभराचा आपला आलेख तयार असेल. विद्यार्थी वर्ग कठोर परिश्रम घेण्याची तयारी दाखवेल. शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. नोकरी व्यवसायात लहान मोठे बदल अपेक्षित आहेत. मकर संक्रांत नवे करार घेऊन येईल. गुरुबल उत्तम असल्याने विवाहोत्सुकांनी विवाहाचे मनावर घ्यावे. विवाहित मंडळी एकमेकांसाठी वेळ राखून ठेवतील. सहवासाने प्रेमबंध दृढ होतील. जागेचे व्यवहार अपेक्षित वेळेत होणे कठीण आहे. विलंब होईल. गुंतवणूकदारांचे अच्छे दिन येतील. अर्थात त्यामागे त्यांचा अभ्यास आणि परिश्रम असतील. डोळ्याचा त्रास, कंबरेत चमक भरणे अशा गोष्टींचा सामना करावा लागेल.

फेब्रुवारी (February Horoscope 2025)

पुढे जाण्याची जिद्द आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची हिंमत दाखवणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्ग काहीतरी करून दाखवण्याच्या तयारीत असेल. वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमात आपले नाव चमकेल. नोकरी व्यवसायात आपले मत ठामपणे मांडाल. व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यकारिणीतील त्रुटी दाखवून द्याल. महाशिवरात्रीच्या सुमारास आत्मविश्वास दुणावेल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. गुरुबळाचा संपूर्ण लाभ घ्याल. विवाहित दाम्पत्यांना आपल्या कामकाजात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. घर, वाहन, जमीन यांच्या खरेदीला पूरक ग्रहमान आहे. गुंतवणूकदारांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. सुरक्षित गुंतवणुकीवर भर द्याल. शिरा, नसा, स्नायू ताणले जातील. अचानक त्यावर भार येईल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने केलेला व्यायाम उपयोगी पडेल.

हेही वाचा…Virgo 2025 Horoscope : २०२५ मध्ये विद्यार्थी, नोकरदारांचे उजळणार नशीब; कन्या राशीसाठी कोणता महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर? जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य…

मार्च (March Horoscope 2025)

जे हातून निसटले त्याचा फारसा विचार न करता अजूनही जे आपल्या हाती आहे, करण्याजोगे आहे, त्याचा विचार करावा हे दाखवून देणारा हा महिना असेल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. गेल्या शैक्षणिक वर्षभरात घेतलेल्या प्रामाणिक मेहनतीचा लाभ विद्यार्थी वर्गाला पुरेपूर मिळेल. होळीमध्ये नैराश्य टाकून द्याल तर रंगपंचमी उत्साहाचे रंग देईल. १८ मार्चला हर्षल वृषभ राशीत प्रवेश करत आहे. नोकरी व्यवसायात कामासंबंधित अद्ययावत ट्रेनिंग घेण्याची संधी मिळेल. २९ मार्चला शनी मीन राशीत प्रवेश करेल. साडेसातीचा शेवटचा टप्पा संपेल. यशाची पताका फडकवत गुढीपाडवा उमेद घेऊन येईल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. घराचे व्यवहार करताना घाई नको. गुंतवणूकदारांनी अस्थिर व असुरक्षित क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे धाडस करू नये.

एप्रिल (April Horoscope 2025)

कामाबरोबर समाजकार्य करण्यात आपल्याला रस वाटेल. सेवाभावी वृत्ती जागृत ठेवाल. विद्यार्थी वर्ग इतर परीक्षांच्या तयारीत गर्क असेल. मानसन्मान मिळण्यापेक्षा ज्ञान मिळवून त्याचा व्यवहारात कसा उपयोग करता येईल, याला आपण महत्त्व द्याल. नोकरी व्यवसायात नव्या करारांनुसार लहान मोठे प्रवास कराल. विवाहोत्सुकांना मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहित मंडळी कौटुंबिक वातावरणात रममाण होतील. कुटुंबात आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल. जमिनीच्या व्यवहारासंबंधी आपली मते ठामपणे मांडाल. नातेवाईकांमध्ये थोडा वाईटपणा पत्कराल. गुंतवणूकदारांसाठी अक्षय्य तृतीया संपत्तीचे हंडे भरभरून आणेल. उष्णतेचे विकार बळावतील. कान व घसा यांवर परिणाम दिसून येईल.

मे (May Horoscope 2025)

लोकांच्या समूहात राहूनही एकांत अनुभवाल. हा एकटेपणा नसून आनंददायी एकांत असेल. घेतलेल्या कष्टाचे समाधान वाटेल. विद्यार्थी उच्च शिक्षणाबाबत अधिक जागरूक असतील. त्याबाबतच्या हालचाली जलद गतीने होतील. नोकरी व्यवसायात बुद्ध पौर्णिमा नवविचार धारा घेऊन येईल. १४ मे रोजी गुरु षष्ठातील मिथुन राशीत प्रवेश करत आहे. गुरुबल थोडे कमी होईल, पण साहाय्यकारकच असेल. विवाहितांना जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. कौटुंबिक समारंभात हिरिरीने सहभागी व्हाल. २९ मे रोजी वक्र गतीने राहू द्वितीयात कुंभ राशीत प्रवेश करेल, तर केतू अष्टमातील सिंह राशीत प्रवेश करेल. धनसंपत्तीचा जपून विनियोग करावा. गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा! अनावधानाने झालेली चूकदेखील महागात पडेल. खांदे, छाती आणि डोकं यांचे आरोग्य सांभाळावे.

जून (June Horoscope 2025)

मेहनत, चिकाटी आणि जिद्द या त्रिसूत्रीचा या महिन्यात अतिशय लाभ होणार आहे. विद्यार्थी वर्गाला देखील हा फॉर्म्युला लागू पडेल. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून मन लावून एकाग्रतेने अभ्यास कराल. एखाद्या विषयाची आवड निर्माण करण्यास शिक्षक तयारी दाखवतील. नोकरी व्यवसायात बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतील. विवाहित दाम्पत्यांसाठी वटपौर्णिमा विशेष फलदायी ठरेल. प्रेमबंध अधिक दृढ होतील. घर, जमीन, प्रॉपर्टीचे काम राखडेल. संबंधीतांमध्ये एकवाक्यता नसल्याने चर्चा फिस्कटेल. धीर सोडू नका. गुंतवणूकदार आपला पैसा आणि व्यवहारज्ञान यांची सांगड घालतील. मोठी जोखीम नको. ताप, खोकला त्रास देईल. शरीरातील उष्णतेच्या असंतुलनामुळे जीवाची घालमेल असह्य होईल.

जुलै (July Horoscope 2025)

मेहनत, जिद्द आणि सराव या त्रिगुणीचा प्रभाव या महिन्यात प्रकर्षाने दिसून येईल. आपल्या हक्काचा मोबदला मिळेल. विद्यार्थी वर्ग जोमाने अभ्यासाला लागेल. आषाढी एकादशीच्या आसपास लाभकारक घटना घडेल. नोकरी व्यवसायात पैसे, मानमरातब आणि प्रसिद्धी मिळेल. गुरू पौर्णिमेला प्रवास योग आहे. देश विदेश फिराल. धार्मिक तीर्थक्षेत्राला भेट द्याल. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधन सुरू ठेवावे. विवाहित दाम्पत्यांनी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी वेळ राखून ठेवावा. प्रॉपर्टीचे प्रश्न लांबणीवर पडतील. मध्यस्थी मार्फत व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. कायद्याच्या कचाट्यात पडू नका. गुंतवणूकदारांना नव्या संधी उपलब्ध होतील. आपल्या कष्टाचे पैसे डोळसपणे गुंतवा. दीर्घ मुदतीसाठी ठेवल्यास लाभ मिळतील. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. औषधोपचारासह व्यायामाचे देखील महत्व लक्षात घ्यावे.

हेही वाचा…Sagittarius Yearly Horoscope 2025 : धनु राशीच्या आयुष्याचे होणार सोने! आर्थिक लाभ, मोठे प्रकल्प तर रखडलेली कामे होतील पूर्ण; सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य

ऑगस्ट (August Horoscope 2025)

आपल्या मेहनतीची दखल घेणारा आणि त्याचा उत्तम मोबदला देणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासासह इतर अनेक विषयात गर्क असतील. सामाजिक बंध, व्यवहार ज्ञान आणि संवाद कौशल्य विकसित होतील. नोकरी व्यवसायात नारळी पौर्णिमा लाभकारक ठरेल. विवाहोत्सुकांचे विवाह योग, जन्माष्टमीच्या आसपास मनपसंत जोडीदाराची निवड कराल. मोठी रक्कम गुंतवताना मनात धाकधूक राहील. तज्ज्ञांचा सल्लादेखील स्वतः पडताळून बघाल. जमीनजुमला, घर यांच्या विक्रीसाठी आणखी थोडा धीर धरावा लागेल. कौटुंबिक समारंभात मानाचे स्थान भूषवाल. श्री गणेशाचे आगमन आनंद आणि उत्साह घेऊन येईल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवाल. आरोग्याची काळजी घेण्यात आपण हयगय करणार नाही.

सप्टेंबर (September Horoscope 2025)

रीत, परंपरा, संस्कृती यांचे पालन करणे आपला मूळ स्वभाव असला तरी पितृपक्षाबाबतचे पुरोगामी विचार मांडाल. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्याल. विद्यार्थी वर्ग नव्या संकल्पना सादर करेल. सर्जनशीलता पणाला लावेल. नोकरी व्यवसायात विशेष लाभकारक घटना घडतील. सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागेल. जिद्दीने पुढे जाल. विवाहित मंडळींनी जोडीदाराला वेळ दिल्याने एकमेकांतील नाते खुलेल. कौटुंबिक अडचणींवर मात कराल. घराच्या, प्रॉपर्टीच्याबाबत संबंधितांना योग्य कल्पना देऊन ठेवा, त्यांना अंधारात ठेवू नका. गुंतवणूकदारांना नवरात्रात थोडी विश्रांती घ्यावी लागेल. भरधाव पुढे जाताना स्वल्पविराम आवश्यक असतो याची प्रचिती येईल. दुसऱ्यांच्या वागण्यामुळे स्वतःची चिडचिड करून घेऊ नका.

ऑक्टोबर (October Horoscope 2025) :

२ ऑक्टोबरचा दसरा साजरा करण्यासाठी समाजातील वाईट गोष्टी नष्ट करण्याची मोहीम राबवाल. विद्यार्थी वर्ग आळस, नैराश्य या वैयक्तिक नकारात्मक भावना दूर सारेल. नोकरी व्यवसायात नवे करार हितकारक ठरतील. हितशत्रूंचा त्रास वाढेल. १८ ऑक्टोबरला गुरु सप्तमातील कर्क राशीत प्रवेश करेल. अल्प काळासाठी उत्तम गुरुबल प्राप्त होईल. दिवाळी आनंदाची जाईल, पण त्या दिवसात डोक्यात अनेक विचारांचे काहूर असेल. मनःशांती ढळू देऊ नका. विवाहोत्सुकांचे विवाह ठरण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबातील व्यक्तींना आपल्या सोबतीचा मोठा आधार वाटेल. कोर्ट कचेरीच्या कामात आपल्याकडून दिरंगाई नको. सांध्यात चमक भरेल. कंबर भरून येईल. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी. आर्थिक स्थिती अस्थिर नसली तरी व्यवहार तोट्यात जाऊ देऊ नका.

नोव्हेंबर (November Horoscope 2025)

ठरवल्याप्रमाणे गोष्टी होत गेल्या की हुरूप वाढतो आणि पुढची कामेदेखील मार्गी लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव घ्याल. विद्यार्थ्यांनादेखील आपल्या गुणपत्रिकेवरून हे दिसून येईल. अभ्यासातील सातत्य आणि चिकाटी ढळू देऊ नका. ११ नोव्हेंबरपासून गुरु वक्री होईल. नोकरी व्यवसायात कामानिमित्त लहान मोठे प्रवास कराल. वैचारिक देवाणघेवाण होईल. कलात्मक व सर्जनशील गोष्टींमध्ये मन रमेल. देव दिवाळी ते चंपाषष्ठी या दरम्यान आनंदवार्ता समजेल. कष्टाचे चीज होईल. विवाहोत्सुकांच्या विवाहासंबंधी चर्चा सुरू होतील. विवाहित दाम्पत्यांना थोडी तडजोड करावी लागेल. एकमेकांतील समजूतदारपणा नाते दृढ होण्यास कामी येईल. घराच्या, प्रॉपर्टीच्या कामकाजात हालचाली वाढतील. आशेचे किरण दिसतील. गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. लाभकारक बदल अनुभवाल. पोट, पचन आणि वातविकार बळावतील. सांधेदुखी डोकं वर काढेल. वैद्यकीय सल्ला आणि उपचार वेळेवर घ्यावेत.

हेही वाचा…१० जानेवारी पंचांग: पुत्रदा एकादशीला १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख आणि सौभाग्य? भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होणार का? वाचा राशिभविष्य

डिसेंबर (December Horoscope 2025)

श्री दत्त जयंती उत्साहवर्धक ठरेल. ५ डिसेंबरला गुरु वक्र गतीने षष्ठातील मिथुन राशीत पुन्हा प्रवेश करेल. विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासात वेग येईल. भविष्याकडे दृष्टी ठेऊन प्रयत्नपूर्वक केलेला अभ्यास उत्तम यश मिळवून देईल. नोकरी व्यवसायात महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकडे वाटचाल कराल. सहकारी वर्ग आणि वरिष्ठ यांच्या मदतीने मोठे प्रकल्प यशस्वीरीत्या हाताळाल. विवाहोत्सुकांनी वधूवर संशोधन सुरू ठेवावे. स्थळे सांगून येतील. आर्थिक नियोजन करताना सण समारंभ, शुभकार्य यांची योग्य दखल घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. गुंतवणूकदारांना जोखीम पत्करून लाभ मिळवणे हिताचे ठरणार नाही. सुरक्षित आणि धोपट मार्ग तो आपला असा विचार कराल. आरोग्य चांगले राहील.

अशा प्रकारे २०२५ हे वर्ष आपणास लाभकारक जाईल. १४ मेपर्यंत गुरुबल उत्तम आहे. तोपर्यंत महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नोकरी, विवाह, प्रॉपर्टी, संतती प्राप्ती यासंबंधित कामांत प्रगती होईल. १४ मेनंतर गुरुबल मध्यम असेल. कामे पुढे सरकतील. तसेच २९ मार्चपासून साडेसाती संपेल. मोकळा श्वास घ्याल. पोट, स्नायू आणि वातविकार याबाबत विशेष जागरूक राहिलात तर २०२५ हे वर्ष आपणास सुखकारक ठरेल.