Chaitra Navratri 2025: हिंदू पंचांगच्या चैत्र महिन्यात येणारे नवरात्र ३० मार्च रोजी सुरू होणार आहे, जे ८ एप्रिलला समाप्त होतील. या नवरात्रीमध्ये माता दुर्गा अदृश्य स्वरुपात लोकांच्या अडचणी दूर करतील. त्यांना भरपूर आर्थिक लाभ आणि सुख समृद्धी मिळेल. जाणून घेऊ या चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार आहे.
धनु राशी
या राशीच्या लोकांसाठी २४ ते ३० मार्चपर्यंतचा सप्ताह अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. त्यांच्या कामापासून सहकाऱ्यांसह बॉससुद्धा खूश होईल. जोडीदाराबरोबर प्रेम संबंध मजबूत होतील. जोडीदाराबरोबर फिरायला जाण्याची संधी मिळू शकते. या लोकांच्या चांगल्या इंक्रीमेंटसह प्रमोशनचे योग जुळून येतील.
मिथुन राशी
या राशीच्या लोकांसाठी हा सप्ताह थोडा मिश्र स्वरुपाचा असेल. काही कामांमध्ये या लोकांना यश मिळेल तर काही कामांमध्ये यांना निराशा मिळेल. या लोकांनी कोणतेही काम नशीबावर सोडण्यापेक्षा आपल्या क्षमतेवर पूर्ण केले पाहिजे. आई दुर्गेचा आशीर्वाद नक्की मिळणार. तसेच कामाच्या ठिकाणी यशस्वी होणार. कोणत्याही जुन्या गुंतवणूकीतून अचानक धनलाभ मिळू शकतो.
तुळ राशी
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम जाईल. अनेक लहान मोठे आनंद साजरे करणार. वित्तीय दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला फायद्याचा ठरू शकतो. दीर्घ काळापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात. जुन्या मित्रांना खूप दिवसानंतर भेटण्याचा योग निर्माण होऊ शकतो. अनावश्यक खर्च करण्यापासून वाचवा आणि पैशांची बचत करा. हीच बचत दीर्घ काळानंतर मोठा लाभ देईल.
वृषभ राशी
या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. न्यायालयीन प्रकरणात या लोकांना न्याय मिळेल. विरोधी पक्षातील लोक स्वत: पुढे होऊन तडजोडीने प्रकरण सोडवण्याचा आग्रह धरू शकतात. हे लोक त्यांचा जुना प्रोजेक्ट सुरू करू शकतात. मुलांचा शिक्षणात निकाल चांगला दिसून येईल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहीन.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांना या सप्ताहमध्ये आई वडिलांच्या आशीर्वाद लाभेन. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक संबंध उत्तम राहीन. आयुष्यातील सुखाच्या क्षणाचा आनंद घेऊ शकाल. या आठवड्यात दिल्ली एनसीआरच्या कोणत्याही प्रसिद्ध मंदिराचे दर्शन करायला जाऊ शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. हे लोक नवीन ठिकाणी जॉब स्विच करण्याचा प्लान सुद्धा करू शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)