Chaitra Navratri Shubh Muhurat: हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या सुरुवातीलाच चैत्र नवरात्र सुरु होत आहे. २२ मार्च २०२३ ला म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र सुरु होत आहे. या नऊ दिवसात माता लक्ष्मी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी भूतलावर येत असल्याचे म्हंटले जाते, चैत्र महिन्यातील वासंतीय नवरात्री यंदा अत्यंत शुभ अशा पाच ग्रहांच्या महासंयोगासह जुळून आली आहे. मीन राशीत ग्रहांचे राज सूर्य देव, प्रेमळ चंद्र, गुरू ग्रह, बुध व नेपच्यून हे ग्रह एकत्र विराजमान होणार आहेत, वैदिक ज्योतिष अभ्यासकांचं माहितीनुसार हा ग्रह संगम अत्यंत शुभ सिद्ध होण्याची चिन्हे आहेत. याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव १२ राशींवर दिसून येणार आहे. मात्र चार अशा राशी आहेत ज्यांना पंचग्रह राजयोगाचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. या राशींना धनलाभासह प्रचंड मान- सन्मान लाभू शकतो. या भाग्यवान राशीत तुमचाही समावेश आहे का चला पाहूया ..

चैत्र नवरात्रीपासून लक्ष्मी ‘या’ राशींना करणार श्रीमंत?

मिथुन (Gemini Zodiac)

मीन राशीमध्ये तयार होणारा पंचग्रह राजयोग हा मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. या मंडळींना करिअरच्या बाबत लवकरच एखादी आनंदाची वार्ता कानी येऊ शकते. तसेच मिथुन राशीच्या व्यवसायिक मंडळींना माता लक्ष्मीचा विशेष कृपाशिर्वाद लाभू शकतो. या येत्या काळात आपल्याला कौटुंबिक प्रेम व एकोपा अनुभवता येऊ शकतो. तसेच तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा काहीसे आनंदाचे क्षण येऊ शकतात. याचे कारण तुम्ही बानू शकता.

Surya Nakshatra Gochar 2024
२९ डिसेंबरपासून मिळणार छप्परफाड पैसा! सूर्यदेवाच्या कृपेने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
shani gochar 2024 shash rajyog in marathi
शनीचा शश राजयोग ‘या’ ४ राशींना देणार प्रचंड धनलाभ? मार्च २०२५ पर्यंत अपार श्रीमंतीसह अनुभवू शकतात अच्छे दिन
shani shukra yuti 2024
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना नवीन वर्षात होईल आर्थिक लाभ, मिळणार दुप्पट पैसा
Shukra gochar 2025 venus transit in meen
Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार मालामाल; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख
shukra rashi parivartan 2024
२८ डिसेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा? शुक्राच्या राशी परिवर्तनाने मिळणार श्रीमंत होण्याची संधी

कर्क (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या गोचर कुंडलीत पंचग्रह राजयोग काही मोठ्या उलाढाली घडवू शकतो. याचा प्रभाव तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात अधिक दिसून येऊ शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होऊन लवकरच तुम्हाला पदोन्नती व पगारवाढ मिळू शकते. यामुळे तुमचे आर्थिक स्रोत सुद्धा वाढतील. भावंडांचे प्रेम व साथ मिळेल. तुम्हाला संततीप्राप्तीचे सुद्धा योग आहेत. शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी येणारा महिना लाभदायक सिद्ध होऊ शकतो.

कन्या (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या मंडळींना पंचग्रह महाराजयोग हा आर्थिक तंगीतून सुटका देऊ शकतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला गुंतवणुकीतून प्रचंड लाभ कमावण्याची संधी आहे. तुम्ही वाहन किंवा घराच्या खरेदीतून सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकता. महिलांसाठी येणारा महिना अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. प्रलंबित कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा<< गुढीपाडव्याला दोन दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींच्या भाग्याला मिळू शकते कलाटणी; धनलाभाचे अच्छे दिन होणार सुरु?

मीन (Pisces Zodiac)

गुरुची रास मीन ही लक्ष्मी कृपेने सोन्याहून पिवळा असा सुखाचा काळ अनुभवू शकते. येत्या महिन्याभरात प्रत्येक दिसव्ही तुमच्या सुखाला चार चांद लागू शकतात. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड धनलाभ होऊ शकतो. या अनपेक्षित फायद्यामुळे तुम्हाला कुटुंबासह एखाद्या ट्रिपवर जाण्याची संधी मिळू शकते. तुमच्या प्रेमाच्या माणसांच्या आयुष्यात काही बदल घडू शकतात ज्याचा शुभ प्रभाव तुमच्या आयुष्यावर सुद्धा दिसून येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader