Chandra Gochar 2025: ज्योतिषशास्त्र सांगतं की, ग्रह-ताऱ्यांचा संबंध हा सर्व १२ राशींशी असतो. प्रत्येक राशीवर विशिष्ट ग्रहाची कृपा असते. मग त्या ग्रहाचे गुणधर्म त्या त्या राशीच्या व्यक्तींमध्ये उतरतात, असं ज्योतिषी म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र देव मनाचा कारक मानला जातो. चंद्र देवाची कृपा झाल्यास साधकाला जीवनात शुभ फळे प्राप्त होतात, असे मानले जाते. आता वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार, या वर्षी चैत्र पौर्णिमा शनिवार, १२ एप्रिल २०२५ रोजी साजरी केली जाईल. प्राचीन काळात हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. म्हणून दरवर्षी या तारखेला हनुमान जयंती साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमेच्या दोन दिवस आधी गुरुवार, १० एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ७:०४ वाजता चंद्र सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करील. चैत्र पौर्णिमेपूर्वी चंद्राच्या हालचालींतील बदलामुळे काही राशींच्या लोकांना आयुष्यात चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. चला तर पाहू कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे भाग्य उजळणार?
वृषभ
ज्यांची रास वृषभ आहे, त्या लोकांना चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. नोकरीत बढती मिळू शकते. तुम्हाला नवीन व्यवसायिक कल्पना सुचतील आणि प्रवासात फायदा होऊ शकतो. लेखनादी क्षेत्रात असणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसून येऊ शकते. नवीन प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.
कर्क
ज्या व्यक्तींची रास कर्क आहे, त्या लोकांना कर्जातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होऊन मालमत्ता, गुंतवणूक आणि नोकरीत अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी, व्यवसाय किंवा परदेशांत अभ्यासाची योजना आखत आहेत, त्यांना चांगले परिणाम अनुभवास येण्याची पूर्ण शक्यता आहे. नोकरदार लोकांची प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या ऑफर्स मिळू शकतात. व्यवसायात अनेक मोठ्या करारांना अंतिम स्वरूप मिळू शकते.
मीन
वडिलोपार्जित संपत्तीसंदर्भातील चांगली बातमी मीन राशीच्या लोकांना मिळू शकते. नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. वेळेचा तुम्हाला योग्य प्रकारे वापर करावा लागेल. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)