12 April 2025 Rashi Bhavishya In Marathi : १२ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी रविवारी सकाळी ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत चालेल. संध्याकाळी ६ वाजून ०८ मिनिटांपर्यंत व्याघ्यात योग जुळून येईल. हस्त नक्षत्र संधयाकाळी ६ वाजून ०८ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय, आज चैत्र पौर्णिमा असेल आणि श्री हनुमान जयंती सुद्धा साजरी केली जाईल. आजच्या दिवशी मारुतीराया नक्की कुणाला आशीर्वाद देणार आणि चैत्र पौर्णिमा कोणाला देणार बळ हे आपण जाऊन घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

१२ एप्रिल पंचांग व राशिभविष्य ( Daily Prediction For Zodiac Signs) :

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

सेवावृत्तीने कामे हाती घ्याल. फक्त स्वत:चा विचार करू नये. कौटुंबिक प्रेम वाढीस लागेल. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

तुमची धार्मिकता वाढीस लागेल. आत्मविश्वासाने कामे हाती घ्याल. सर्वांशी आनंदाने वागाल. हसत-खेळत कामे कराल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

घाई घाईने कामे उरकाल. एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. व्यावसायिक लाभाकडे विशेष लक्ष ठेवावे. चोरांपासून सावध राहावे. क्षणिक आनंद उपभोगाल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. कामात मित्रांची मदत होईल. नवीन ओळखी वाढतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. हातातील कामात यश येईल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

वडीलांची उत्तम साथ मिळेल. पारंपरिक कामात प्रगती कराल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

हातून एखादे सत्कार्य घडेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधि चालून येईल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. सट्टा, लॉटरी यांसारख्या मार्गाने लाभ संभवतो. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. वैचारिक शांतता जपावी.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

वैवाहिक सौख्याला बहर येईल. सहकुटुंब प्रवासाचा आनंद घ्याल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. जवळचे मित्र गोळा कराल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

घरी जवळचे नातेवाईक गोळा होतील. जवळच्या लोकांशी हितगुज कराल. मानसिक शांतता शोधाल. पत्नीची बाजू समजून घ्यावी. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

फार अट्टाहास करू नका. जुन्या गोष्टींनी खिन्न होणे टाळावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्यावा. सरकारी कामात प्रगती होईल. जोडीदाराचे कौतुक कराल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

बोलण्यातून इतरांच्या मनाचा ठाव घ्याल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. चौकसपणे कामाच्या बाबी जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडावेत.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

आवडते पुस्तक वाचाल. सखोल विचारांती निर्णय घ्याल. तुमची वैचारिक उत्क्रांती होईल. भावंडांचे सौख्य लाभेल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitra purnima 2025 special horoscope aries to pisces get what they want read rashi bhavishya in marathi asp