Mesh To Meen Horoscope : २ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत राहील. आयुष्मान योग रात्री २ वाजून ५० मिनिटांपर्यंत जुळून येणार आहे. तसेच कृतिका नक्षत्र सकाळी ८ वाजून ५० मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय आज श्री लक्ष्मी पंचमीही साजरी होणार आहे आणि आज चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस लक्ष्मी पंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल की अशुभ जाणून घेऊया…
२ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today) :
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
खाण्यावर बेताने ताव मारा. विद्यार्थ्यांसमोर नवीन संधि चालून येईल. शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
धार्मिक गोष्टीत प्रगती कराल. हवामानानुसार काही बदल करावेत. महत्त्वाची कामे पार पडतील. प्रामाणिकपणा व सचोटी सोडू नका. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
उपासनेमुळे काही त्रास कमी होतील. काही क्षणिक आनंद घ्याल. जबाबदारी सक्षमपणे पेलाल. निर्धास्तपणे वागू नका. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. वडीलधार्यांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक नाराजी दूर करावी. सार्वजनिक कामात कौतुक केले जाईल. नोकरदारांनी नरमाईची भूमिका घ्यावी.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
योग्य अयोग्याची शहानिशा करावी. भावनेच्या आहारी जाऊ नका. कलाकारांच्या कलेचे कौतुक केले जाईल. सांधेदुखीचा त्रास संभवतो. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
धीर व संयम बाळगावा लागेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी राहतील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. चारचौघांत कौतुक केले जाईल
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
भावंडांशी वादाचे प्रसंग संभवतात. सारासार विचारातून कृती करावी. देणी फेडता येतील. सासुरवाडीकडून शुभवार्ता मिळेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
अधिक कष्टाची गरज पडेल. गणेशाची उपासना करावी. वैवाहिक सौख्यात मिठाचा खडा पडू देऊ नका. मनोरंजनाचे बेत आखले जातील. विरोधकांची संख्या वाढू शकते.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
घरातील ताणतणाव दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला मानावा. कोणतेही टोकाची भूमिका घेऊ नये. आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. धार्मिक कामात मन गुंतवावे.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
लेखन कलेला वाव मिळेल. चटकन मत प्रदर्शित करू नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. गरज पडल्यास शांत राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सामुदायिक गोष्टींचे भान ठेवावे. घरातील कामात गुंग व्हाल. नवीन मित्र जोडावेत. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
छंद जोपासायला वेळ द्या. अधिकारी व्यक्तींचा वेळोवेळी सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सडेतोडपणे मत मांडाल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर