Chanakya Niti Financial Crisis: आचार्य चाणक्य हे सर्वात विद्वान व्यक्तींपैकी एक मानले जातात. जीवन संघटित पद्धतीने कसे चालावे याचे अनेक नियम त्यांनी सांगितले आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनानुभवातून ते विचार सर्वांसोबत शेअर केले आहेत, जे आज लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. चाणक्यच्या प्रत्येक विषयावर सखोल विचार केल्यानंतर त्याचे चांगले-वाईट परिणाम नीतीशास्त्रात सांगितले आहेत. चाणक्यने आपल्या नीतीशास्त्रात माणसाने काय करावे आणि काय करू नये, याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, घरामध्ये आर्थिक संकट येणार असेल तर त्याचे काही संकेत मिळतात. या संकेतांची चाहूल लागल्यास वेळीच सावध होणे कधीही चांगले, असे ते सांगतात.

घरात वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात ‘हे’ संकेत

१. घरातील तुळशीचे रोप सुकणे

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, साधारणपणे प्रत्येकजण आपल्या घरात तुळशीचे रोप लावतो. हिंदू धर्मात या वनस्पतीची पूजा केली जाते आणि ती खूप शुभ मानली जाते. अशा स्थितीत आचार्य सांगतात की, तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक सुकत असेल तर ते आर्थिक संकट येण्याचे लक्षण आहे, म्हणून आपण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

२. कुटुंबामध्ये वाद

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, तुमच्या घरात अनेक लोकं असतील तर त्यांच्यात मतभेद असू शकतात. पण, जर त्यांच्यात कलह असेल तर त्या घरात नेहमी भांडणे होतात. घरात सतत वाद होत असतील तर दारिद्र्य वाढू लागतं. अशा परिस्थितीत घरामध्ये नेहमी वाद होत असेल तर ते आर्थिक संकट येण्याची चिन्हे आहेत.

३. काच वारंवार तुटणे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर तुमच्या घरात काच वारंवार तुटत असेल तर ते आर्थिक संकटाचेही लक्षण आहे. ज्या घरांमध्ये वारंवार काचेच्या वस्तू तुटतात, अशा घरांमध्ये दारिद्र्य येतं. हिंदू धर्मामध्ये काच तुटणे हे अशुभ मानलं जातं.

४. घरात नियमितपणे पूजा न करणे

आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या घरात पूजा केली जात नाही तिथे सुख आणि समृद्धी राहत नाही. माणसांमधले प्रेमही कमी होते आणि मतभेद वाढतात. ज्या घरात पूजा होत नाही तिथे लक्ष्मी वास करत नाही. हे देखील आगामी आर्थिक संकटाचे लक्षण आहे.

५. मोठ्यांचा अपमान करणे

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, आपण सर्वांनी आपल्या ज्येष्ठांचा नेहमी आदर केला पाहिजे. असे न केल्यास त्यांचे मन दुखावले जाईल. जे लोक मोठ्यांशी असं वागतात ते आयुष्यात कधीच सुखी नसतात. ज्या घरात मोठ्यांचा अपमान होत असेल, त्या घरात वाईट दिवस येतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)