Chanakya Niti Relationship Advice : पती-पत्नी हे नाते प्रेम, विश्वास आणि समजूदारपणा यावर आधारित आहे. पण कित्येकदा नकळतपणे पती आपल्या पत्नीबद्दल काही अशा गोष्टी सांगतात ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येतो. आचार्य चाणाक्य यांच्या मते, काही गोष्टी फक्त नवरा- बायको यांच्यात राहिल्या पाहिजे. जर नवरा या गोष्टी कोणालाही सांगत नसेल तर नात्यातील गोडवा वाढतो आणि पती- पत्नी नात्याचा मान राखला जातो. अशा स्थितीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याबाबत इतरांना सांगणे टाळावे, हे जाणून घ्या.
पत्नी तुमच्यावर किती प्रेम करते हे कोणालाही सांगू नका.
जर तुमची पत्नी तुमच्यावर खूप प्रेम करते तर त्याबाबत इतरांना सांगू नये. आचार्य चाणक्य सांगतात, त्यामुळे काही लोकांना तुमच्याबद्दल इर्षा वाटू शकते त्यामुळेहे लोक तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट दुसऱ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. सुखी विवाहित जीवनातील काही गोष्टी खाजगी ठेवल्या पाहिजे.
पत्नीच्या माहेरच्या गोष्टी कोणालाही सांगू नका
प्रत्येक कुटुंबात काही ना काही खासगी गोष्टी असतात. जर पत्नी आपल्या माहेरची एखादी गोष्ट तुमच्याकडे सांगत असेल तर ती इतरांबरोबर शेअर करू नका. त्यामुळे फक्त पत्नीला वाईट वाटू शकते तर तुमचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो. लग्नानंतर पती-पत्नी दोघांच्या आयुष्यात कुटुंबाचा सन्मान केला पाहिजे.
तुमच्या पत्नीच्या वाईट सवयींबद्दल इतरांना सांगू नका.
जर तुमच्या पत्नीला जास्त राग येत असेल, जास्त पैसे खर्च करत असेल किंवा एखाद्याबद्दल वारंवार तक्रार करत असेल तर यासारख्या वाईट सवयी असतील तर त्या इतर कोणालाही सांगू नका. आचार्य चाणक्य यांच्या मते, “प्रत्येक माणसामध्ये काही कमतरता असतात, परंतु त्या बाहेर उघड केल्याने नाते कमकुवत होऊ शकते. आपण परस्पर संवादातून या सवयी सुधारण्याचा प्रयत्न केला तर बरे होईल.”
पत्नीच्या आरोग्याशी संबंधित गोष्टी सांगू नका.
जर पत्नीची तब्येत ठीक नसेल किंवा तिला काही शारीरिक थकवा असेल तर ती इतर कोणालाही सांगण्याची गरज नाही. असे केल्याने पत्नीला वाईट वाटू शकते आणि काही लोक त्याचा चुकीचा फायदा देखील घेऊ शकतात. वैवाहिक जीवनात, पती-पत्नीने एकमेकांना आधार दिला पाहिजे आणि एकमेकांच्या कमकुवतपणा उघड करू नये.
पत्नीचा भूतकाळ
प्रत्येक व्यक्तीचा एक भूतकाळ असतो. जर लग्नापूर्वी पत्नीच्या आयुष्यात दुसरे कोणी होते किंवा भूतकाळातील काही समस्या असतील तर त्याबद्दल इतर कोणाशीही चर्चा करणे योग्य नाही. यामुळे पत्नीला त्रास तर होऊ शकतोच, पण नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणून, भूतकाळ विसरून पुढे जाणे शहाणपणाचे आहे.