Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक महान विद्वान होते. ते अर्थशास्त्राचे सर्वात महान जाणकार मानले जातात. त्यांनी अर्थशास्त्र, नाट्यशास्त्रासह अनेक ग्रंथांची रचना केली होती. त्यांनी आपल्या चाणक्य नीति या ग्रंथात जीवनाशी संबंधित सर्व बाबींबद्दल सांगितले आहे. चाणक्य नीतीमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंध तसेच त्यांच्या गुणांचाही उल्लेख आहे. आचार्य चाणक्य यांनी स्त्री आणि पुरुषांविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. जसं की स्त्री-पुरुषांनी आपलं गुपित कधीच कुणासमोर सांगू नये, नाहीतर याने भविष्यात अडचणी येऊ शकतात. आचार्यांनी माणसाला प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या कोणत्या आहेत या गोष्टी… 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्त्री-पुरुषांनी गुप्त ठेवाव्यात ‘या’ गोष्टी!

१. चारित्र्य

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, विवाहानंतर स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांच्या चुका दाखवून देणं कमी केलं पाहिजे. एकमेकांच्या उणीवा झाकल्या पाहिजेत. यासोबत कुटुंबामध्ये होणारी भांडणे आपापसात सोडवावे. यासोबतच स्त्री किंवा पुरुष घरातील गोष्टींबद्दल बाहेरील कोणत्याही व्यक्तीला सांगत असेल तर त्याचा वाईट परिणाम होऊन वैवाहिक जीवनात अडचण येऊ शकते. कारण तुम्ही ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी सांगाल ती दरवेळी तुमच्या दुःखात सामील होईल असं नाही. वेळ आल्यावर ती तुमची चेष्टाही करण्यास मागे पुढे पाहणार नाही.

(हे ही वाचा : पुढील वर्षाच्या सुरुवातीला ‘शुभ योग’ बनल्याने ‘या’ ३ राशी होतील गडगंज श्रीमंत? २०२४ मध्ये मिळू शकते प्रचंड धनलाभाची संधी )

२. आर्थिक नुकसान

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जर तुमचं आर्थिक नुकसान झालं असेल तर ते कधीही कोणासमोर व्यक्त करू नये. कारण, इतर लोक नुकसानीबाबत दु:ख व्यक्त करतील पण प्रत्यक्षात आनंदी असतील. तसेच याउलट ते लोक तुमच्या मागे निंदा करतील. यामुळे तुमचा समाजातील सन्मान देखील कमी होतो. यामुळेच आर्थिक नुकसान झाल्याचं कोणालाही सांगू नका. अन्यथा लोकं तुमच्यापासून दुरावू शकतात.

३. बदनामी

आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुमचा कोणी अपमान केला असेल किंवा तुम्हाला दुखावल्या गेलं असेल तर ते कोणालाही सांगू नका. कारण ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगणार आहात ती व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा त्यावर हसू शकते, वेगळा काही विचार करु शकते. मग पती-पत्नी असली तरीही ही गोष्ट लपवूनच ठेवली पाहिजे. म्हणून तुमच्यासोबत झालेल्या अपमानाबद्दल कोणालाही सांगू नका.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti about married life chanakya niti men and women should hide these things forever pdb