Chanakya Niti चाणक्य नितीमध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, काही चुकीच्या सवयींमुळे व्यक्ती श्रीमंत होण्याऐवजी गरीब होऊ शकता. जर तुम्ही आपल्या सवयी बदलल्या नाहीतर तर तुमच्याकडे धन टिकणार नाही. चाणक्यनिती आचार्य चाणक्य यांनी लिहलेली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. हे निती शास्त्र कित्येक दशकांपासून लोकांना मार्गदर्शन करते. या निती शास्त्रामध्ये कित्येक महत्तपूर्ण सिद्धांत आणि निती सांगितल्या आहे जे व्यक्तीला यशाच्या दिशेने घेऊन जातात. व्यक्तीला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही वाईट सवयी सोडाव्या लागतील असे चाणक्यनितीमध्ये सांगितले आहे. कोणत्या आहेत या वाईट सवयी जाणून घेऊ या.
पैशांचा लोभ
पैशांसाठी लोभ लोभाची भावना देखील तुम्हाला पैशापासून वंचित राहू शकता. जर तुम्हाला नेहमी जास्त पैसे कमवायचे असतील आणि पुण्य कार्यात सहभागी होत नसेल तर तुमची परिस्थिती आणखी बिघडू शकते.
अस्वच्छतेमध्ये राहू नका
आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक अस्वच्छतेत राहतात किंवा त्यांच्या आजूबाजूला स्वच्छ वातावरण ठेवत नाहीत. असे लोक नेहमी गरिबीचे जीवन जगतात. म्हणूनच या वाईट सवयी सोडल्या पाहिजेत.
कडू बोलणे टाळा
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या लोकांचे बोलणे खूप कठोर किंवा कर्कश असते, त्यांच्याकडे माता लक्ष्मी वास करत नाही. कोणत्याही व्यक्तीशी कडवट बोलण्याची सवय लगेच सोडून देणेही योग्य आहे. कडवट बोलल्यामुळे माणसाचे नाते बिघडते आणि त्याच वेळी तो गरीबही होतो.
Chanakya Niti : तुमच्याकडे असतील हे तीन गुण तर तुम्ही असू शकता अत्यंत बुद्धिमान व्यक्ती; सर्वांचे आवडते असू शकता… वाचा, चाणक्य नीती काय सांगते…
सूर्यास्तानंतर कधीही झोपू नका
आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, संध्याकाळी झोपणे देखील शुभ नाही. संध्याकाळी सूर्यास्तानंतर झोपल्याने घरात दारिद्र्य येते. संध्याकाळी झोपणाऱ्यांवर माता लक्ष्मी कधीही आपला आशीर्वाद देत नाही.
( टिप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)