Chanakya Niti : चाणक्य नीती ही जगप्रसिद्ध आहे. आचार्य चाणक्य हे एक महान त्वत्वज्ञानी आणि राजकारणी होते. त्यांनी आयुष्यात नैतिकतेचे धोरण पाळून नीती तयार केल्या आहेत. या नीतीमध्ये त्यांनी जीवन कसे जगावे, हे शिकवले आहे. चाणक्य यांच्या या नीती चाणक्य नीती म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक लोक त्यांच्या नीतीचा अवलंब करतात.
चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये विविध पैलूंविषयी सांगितले. आचार्य चाणक्य यांनी बुद्धिमान व्यक्तीनी काही चूका करू नये, असे सांगितले आहे. त्या चूका कोणत्या, याविषयी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • चाणक्य नीतीनुसार, एक शक्तिवान शत्रू आणि कमकूवत मित्र नेहमी दु:ख देतात. यांच्यापासून सावध राहायला पाहिजे.
  • बुद्धिमान व्यक्तीनी कधीही उपाशी राहू नये. बुद्धी ही अज्ञान दूर करते आणि बुद्धीमुळेच अनेक समस्या दूर होतात. उपाशी राहल्यामुळे बुद्धीवर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर याचा वाईट परिणाम दिसून येतो.

हेही वाचा : तीन शुभ राजयोग बनल्याने तीन राशी होतील मालामाल, मिळणार गडगंज पैसा; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

  • आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या ठिकाणी आदर मिळत नाही, जिथे कमावण्याचा मार्ग नाही, जिथे ज्ञान मिळण्याचा मार्ग नाही, जिथे मित्र किंवा नातेवाईक नाही; तिथे राहून काहीही फायदा नाही. अशी जागा लगेच सोडणे, गरजेचे आहे.
  • चाणक्य यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन खास सूत्र सांगितली आहेत.चाणक्य सांगतात, “ज्या प्रकारे दोन पंखांच्या मदतीने पक्षी आकाशात उडतात, त्याच प्रमाणे कर्म आणि ज्ञान या दोन पंखांनी माणूस सुद्धा उंच भरारी घेऊ शकतो.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti an intelligent person never do these mistakes read what chanakya said about clever people ndj