Chanakya Niti On Friendship : आयुष्यात चांगले मित्र-मैत्रिणी प्रत्येकालाच हवे असतात. कारण सच्चे मित्र कठीण काळात आपल्या पाठीशी उभे राहतात, आनंदासह दु:खाच्या काळात ते आपल्याबरोबर असतात. आपल्या मनातील कोणतीही भावना आपण त्यांच्याकडे व्यक्त करू शकतो. पण, एका चुकीच्या मैत्रीने तुमचे आयुष्य पूर्णपणे खराब होऊ शकते. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात कोणत्या प्रकारच्या लोकांशी मैत्री करणं टाळलं पाहिजे, याविषयी सांगितलं आहे.
आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकारणी नव्हते तर वर्तन आणि नातेसंबंधांची सखोल समज असलेले विचारवंतदेखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाच्या पुस्तकात जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्यामध्ये मैत्रीबाबत खूप महत्त्वाच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. चाणक्य यांच्या मते, मैत्री केवळ भावनिकतेने नव्हे तर विचारपूर्वक केली पाहिजे. जर आपण विचार न करता कोणाशीही मैत्री केली तर ते आपल्यासाठीच हानिकारक ठरू शकते, त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, कोणत्या पाच प्रकारच्या लोकांशी मैत्री करणे टाळावे याविषयी सल्ला दिला आहे.
१) स्वार्थी लोकांपासून राहा दूर
आचार्य चाणक्य यांच्या मते, स्वार्थी व्यक्ती तुमच्याबरोबर तोपर्यंतच असतात जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काही फायदा मिळत असतो. त्यांचे काम पूर्ण होताच ते तुम्हाला ओळखही दाखवणार नाहीत. कठीण काळात असे लोक आपल्यापासून दूर होतात. अनेकदा त्यांच्यामुळे तुमच्या अडचणी वाढतात, म्हणून अशा लोकांना आपल्या जीवनापासून दूर ठेवले पाहिजे.
२) गोड बोलणारी लोक
काही लोक तोंडावर खूप गोड बोलतात, पण त्यांच्या मनात काय चाललं आहे हे कोणालाही कळत नाही. चाणक्य सांगतात की, जी व्यक्ती इतरांपेक्षा जास्त गोड बोलते त्यांच्या हेतूंवर शंका घेतली पाहिजे. असे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दलही वाईट बोलू शकतात आणि गरज पडल्यास तुमचा विश्वासघातही करू शकतात. म्हणूनच चाणक्य सांगतात की, खूप गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे.
३) मूर्खाशी मैत्री करू नका
चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीला बरोबर आणि चूक यात फरक करता येत नाही त्याच्याशी मैत्री करणे धोकादायक ठरू शकते. जर त्याने काही चुकीचे पाऊल उचलले तर तुम्हीही त्याच्याबरोबर राहून त्यात अडकू शकता. मूर्ख माणसाचे कोणतेही निश्चित विचार नसतात आणि त्याचे विचार तुमच्या जीवनावरही परिणाम करू शकतात.
४) रागावलेल्या लोकांपासून रहा सावध
सतत रागावलेल्या लोकांपासून दूर राहणे चांगले. चाणक्य म्हणतात की, रागावलेला माणूस रागाच्या भरात काहीही करू शकतो, तो त्याच्या जवळच्या लोकांनाही हानी पोहोचवू शकतो. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणे कठीण आहे, कारण त्यांचा मूड कधीही बदलू शकतो.