Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितले आहे की, तारुण्य ही असा काळ आहे ज्यावर आपले भविष्य ठरते. या काळात केलेल्या चुकांची शिक्षेच्या स्वरुपात आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. आचार्य चाणक्या आपले ज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर, एका छोट्याशा मुलाला साम्राज्याचा शासक बनवले होते ज्यांना आपण चंद्रगुप्त मोर्य म्हणून ओळखतो. चाणक्यांची शिकवण आजही अनेकांचे आयुष्य घडवते. चाणक्यांनी सामाजिक जीवनाचा विचार करून चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितले की, वयाच्या विशीनंतर या चुका करू नये अन्यथा आयुष्यभर पश्चाताप पदरी पडेल.
राग आणि द्वेषापासून सावध राहा
मानवाचा मोठा शत्रू राग आहेत. राग आल्यावर व्यक्तीची विचार करण्याची क्षमता संपुष्टात येते. तर द्वेष भाव व्यक्तीचे आयुष्य उद्धवस्त करू शकतो. तारुण्यात रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणचाही द्वेष करू नका.
वेळ वाया घालवू नका
चाणक्य सांगतात की, तारुण्यात वेळ वाया घालावू नये अर्थात वेळ हा खूप शक्तीमान आहे आणि जर तुम्ही त्याचे महत्त्व वेळीच समजले नाही तर आपल्याला आयुष्यभर अनेक संकटाचा सामना करावा लागतो. यशासाठी वेळे खूप महत्त्वाची आहे.
पैश्यांचा अपव्यय
चाणक्यांच्या मते, तुम्ही पैसा वाया घालवणे टाळले पाहिजे. तारुण्यात पैश्याचे महत्त्व समजले पाहिजे. आचार्य सांगतात की, नेहमी पैशांची बचत केली पाहिजे. बचत करण्यासाठी पैसा केल्यास संकटाच्या वेळी मदत होते.
आळशीपणा सोडून द्या
चाणक्य नितीनुसार, आळस कोणत्याही व्यक्तीचा मोठा शत्रू आहे. आळशीपणाची सवय लावून घेऊ नका, विशेषत: तारुण्यात. नेहमी लक्षा ठेवा की देव आळशी लोकांची मदत करत नाही.