Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे एक महान विद्वानांपैकी एक आहेत. त्यांचे विचार आणि नीती आजही अनेक लोक फॉलो करतात. असं म्हणतात की जे लोक चाणक्य यांच्या नीती फॉलो करतात त्यांना आयुष्यात भरपूर यश मिळते. आज आपण व्यवसाय करताना चाणक्य यांनी सांगितलेल्या खास नीतींविषयी जाणून घेणार आहोत.

व्यवसायात चढउतार येत असतात. अनेकदा पदरी निराशा येत असते. अशात चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी फॉलो केल्या तर व्यवसायात कधीच अपयश येणार नाही, असे मानले जाते.

Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
pappu yadav death threat
“सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा…”; लॉरेन्स बिष्णोई टोळीची अपक्ष खासदाराला धमकी!
Nimrat Kaur Break Silence On Abhishek Bachchan Dating Rumors
“मी काहीही केलं तरी…”, अभिषेक बच्चनला डेट करण्याच्या चर्चांबाबत निम्रत कौरचे वक्तव्य
salman khan and salim khan effigies burnt in jodhpur
संतप्त बिश्नोई समाजाने सलमान आणि त्याच्या वडिलांचा पुतळा जाळला; सलीम खान यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भावना दुखावल्या…
Nirav Modi Letter of Understanding bank Business |
हिरा है सदा के लिये! – उत्तरार्ध
Pali language, mother tongue, upcoming census, abhijat darja
आगामी जनगणनेमध्ये भारतातील सर्व बौद्धांनी मातृभाषेखालोखालचे स्थान पाली भाषेला द्यावे…
book review the silk route spy book by author enakshi sengupta
बुकमार्क : गुप्तहेर की देशभक्त?

हेही वाचा : उद्यापासून सुरू होणार ‘या’ राशींना चांगले दिवस, अपार धनलाभ होणार ?

१. चाणक्य नेहमी साधे जीवन जगण्यात विश्वास ठेवतात. ते लोकांना सल्ला देतात की साधे जीवन जगावे, अतिखर्च करू नये. यामुळे आर्थिक चणचण भासू शकते.

२. चाणक्य हे मेहनतीवर खूप विश्वास ठेवतात. त्यांच्या मते जी व्यक्ती खूप जास्त मेहनत घेते आणि सतत प्रयत्न करते, तिला व्यवसायात यश मिळते!

३. चाणक्य सांगतात की व्यवसायात निर्णय घेताना स्ट्रेटेजी तयार करा आणि कधीच घाईघाईत निर्णय घेऊ नका.

हेही वाचा : Zodiac signs : चांगली कमाई करुनही या पाच राशींच्या लोकांकडे टिकत नाही पैसा?

४. चाणक्य यांच्या मते व्यवसायात चांगले नेटवर्किंग असणे गरजेचे आहे. जर तुमचे नेटवर्किंग मजबूत असेल तर तुम्ही व्यवसाय वाढवू शकता. याशिवाय व्यवसाय करताना बौद्धिक क्षमता चांगली असणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला चाणक्य देतात.

५. चाणक्य सांगतात की व्यवसाय करताना नवनवीन गोष्टींचे ज्ञान मिळवायला हवे. यामुळे भविष्यात व्यवसाय करताना अडथळा निर्माण होणार नाही आणि व्यवसाय आणखी वृद्धिंगत होण्यास मदत होणार.

हेही वाचा : Swapna Shastra: स्वप्नातल्या ‘या’ गोष्टी मानल्या जातात शुभ? पैशांपासून करिअरपर्यंतच्या सर्व समस्या होऊ शकतात दूर

६ व्यवसायात पैसा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पैसे वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. पैशाची बचत करणे, हा चांगला उपाय असल्याचे चाणक्य सांगतात. भविष्यात अडचणीच्या वेळी बचत केलेले पैसे कामी येऊ शकतात.

७. चाणक्य नीतीनुसार व्यवसायात पैसा विचारपूर्वक इन्व्हेस्ट करावा. एकाच जागी पैसा इन्व्हेस्ट करू नका, असे चाणक्य सांगतात.