Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये मनुष्याचे आयुष्य सोपे आणि सुखी करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या नीती जगप्रसिद्ध आहेत. अनेक राजकारणी, व्यावसायिक त्यांच्या नीतींचे अनुकरण करतात. चाणक्य हे एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञसुद्धा होते. चाणक्य यांच्या मते माणसाची खरी संपत्ती म्हणजे पैसा किंवा सोने नाही. मग चाणक्य नीतीनुसार माणसाची खरी संपत्ती कोणती? आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया.
माणसाची खरी संपत्ती कोणती?
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये धन-संपत्तीचा उल्लेख केला आहे. संपत्ती किंवा धन जमा करण्याच्या नादात माणूस अनेकदा पैसा आणि सोन्याच्या मागे पळतो; पण चाणक्य सांगतात की पैसा किंवा सोने खरी संपत्ती नाही.
माणसाची खरी संपत्ती ही ज्ञान आणि इच्छाशक्ती आहे. जो व्यक्ती अज्ञान आहे, तो श्रीमंत बनू शकत नाही. याशिवाय चाणक्य पुढे सांगतात, ज्या व्यक्तीकडे ज्ञान आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे, ते कोणत्याही कठीण संकटातून मार्ग काढू शकतात.
हेही वाचा : नवऱ्यांनो, परफेक्ट बायकोमध्ये असतात हे पाच गुण; एकदा वाचाच…
- ज्यांच्याकडे ज्ञान आणि इच्छाशक्तीसारखी संपत्ती आहे, असे लोक प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना करू शकतात. बुद्धिमान व्यक्ती ही त्यांच्या ज्ञानामुळे सगळीकडे नावलौकिक कमावते.
- ज्ञानाने परिपूर्ण असणाऱ्या बुद्धिमान व्यक्ती नेहमी चांगले कर्म करतात आणि इतरांनाही चांगले काम करण्यासाठी प्रेरित करतात. चाणक्य नीतीनुसार असे लोक कधीही वाईट संगतीमध्ये दिसून येत नाही.
- जो व्यक्ती खरोखर ज्ञानी आहे, त्याला कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसतो. अज्ञानी लोकांमध्ये नेहमी मोह, लोभ आणि राग दिसून येतो.
- चाणक्य सांगतात की, व्यक्तीने सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्ञान मिळवण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. माणसाने नियमित नवनवीन गोष्टी शिकायला पाहिजे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)