Chanakya Niti : पती-पत्नीचे नाते हे सर्वांत पवित्र नाते मानले जाते. आनंदी जीवनासाठी पती-पत्नीच्या नात्यातील गोडवाही तितकाच महत्त्वाचा असतो. प्रत्येक पत्नीच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात. त्याचप्रमाणे पत्नीच्या काही गोष्टीसुद्धा नवऱ्याला आनंदी ठेवतात. ‘चाणक्य नीती’मध्ये पत्नीच्या त्या गुणांचे वर्णन केले आहे; ज्यामुळे पती नेहमी तिच्यावर खुश असतो. ते चांगले गुण कोणते, याविषयी आज आपण जाणून घेऊ या ….
बचत
‘चाणक्य नीती’नुसार स्त्रियांना पैशांची बचत चांगल्या रीतीने करता येते. त्या थोडे थोडे पैसे जमा करतात आणि कठीण प्रसंगी त्यांची बचत कुटुंबाच्या कामी येते. त्यामुळे जर पत्नीला पैशांची बचत करायची सवय असेल, तर ती पतीला आर्थिक संकटात मदत करू शकते.
हेही वाचा : Astrology : कोणत्या राशीचा कसा असतो स्वभाव? जाणून घ्या बारा राशींचे व्यक्तिमत्त्व
भाषा
भाषा हा खूप महत्त्वाचा पैलू आहे. माणसाची भाषा चांगली, तर त्याचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. चाणक्य सांगतात की, ज्या स्त्रिया नेहमी गोड बोलतात, त्यांचे पती खूप भाग्यवान असतात. अशा पत्नी संपूर्ण कुटुंबाबरोबर मनापासून नाते जपतात; ज्यामुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा होते.
धार्मिक व्यवहार
पत्नी ही धार्मिक असायला हवी, असे चाणक्य सांगतात. महिलांची देवावरील श्रद्धा कठीण काळात कुटुंबाला आधार देते आणि संकटापासून कुटुंबाला दूर ठेवते. पूजा-अर्चना करणाऱ्या महिला या अत्यंत संवेदनशील असतात; ज्यामुळे त्या संस्कारी पत्नी म्हणून ओळखल्या जातात.