Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांचे विचार आणि नीती आजही अनेक लोक फॉलो करतात. चाणक्य यांच्या मते, माणसाने जीवन जगताना काही नीतींचे अनुकरण केले तर त्याला आयुष्यात भरपूर यश मिळते. वैवाहीक आयुष्यासाठी त्यांनी काही विशेष नीती सांगितल्या आहेत. चाणक्य सांगतात की नवऱ्याने बायकोला काही गोष्टी कधीच सांगू नये. त्या गोष्टी कोणत्या, चला तर जाणून घेऊ या.
आचार्य चाणक्य यांच्या मते, नवऱ्याने बायकोला त्याची कमतरता कधीच सांगू नये. नवरा बायकोच्या नात्यात छोटे मोठे वाद होत असतात अशावेळी रागाच्या भरात बायको नवऱ्याचा कमतरतेचा उल्लेख करू शकते.
हेही वाचा : Chanakya Niti : चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी विद्यार्थ्यांना नियमित यशासाठी ठरू शकतात फायदेशीर
चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, नवऱ्याने बायकोला त्याची कमाई कधीच सांगू नये. जर पत्नीला नवरा किती कमावतो, हे माहिती पडले तर ती पैशांचा हिशोब घेऊ शकते किंवा बायको अति खर्च करणारी असेल तर याचा गैरफायदा घेऊ शकते.
जर तुम्ही काही दान केले असेल तर तुमच्या दानाविषयी कुणालाच सांगू नये, अन्यथा दान केलेलं वाया जातं, असं म्हणतात. चाणक्य सांगतात की तुम्ही दान केले हे पत्नीला सुद्धा कधीही सांगू नये.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)