प्रत्येकाची जोडीदाराबद्दल वेगवेगळी स्वप्न असतात. त्यामुळे प्रत्येकाला असा जोडीदार हवा असतो जो फक्त प्रेम करणारचं नाही तर तुम्हाला समजूनही घेईल. यामुळे लग्नाच्या वेळी मुलं मुलींमधील काही गुण बघून लग्नास होकार देतात. यावर आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक संबंधांसह सामाजिक संबंधांबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
आचार्य यांच्या मते, लग्न ठरवताना तुम्ही जोडादाराची चांगली चाचणी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यात एखादा मुलगा लग्नासाठी मुलगी शोधत असेल तर त्याने तिच्यातील ३ गुण तपासले पाहिजेत.
चाणक्य नीतीनुसार, कुटुंबासाठी सून निवडताना तिच्यावर कुटुंबात चांगले संस्कार झालेले असावेत. आपल्या कुटुंबात नेहमी समान कुटुंबातील मुलगी आणली पाहिजे. जर तुम्ही खूप श्रीमंत किंवा गरीब कुटुंबातील मुलीशी संबंध ठेवलात तर भविष्यात अडचणी येऊ शकतात.
धार्मिकदृष्ट्या एकनिष्ठ हवी
जीवनसाथी म्हणून मुलीची निवड करताना ती धार्मिकदृष्ट्या एकनिष्ठ आहे की नाही हेही तपासा. धार्मिक कार्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी मुलगी कुटुंबातील अनेक गोष्टी सांभाळून घेऊ शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते, अशी मुलगी सर्वोत्तम जोडीदार असल्याचे सिद्ध होते.
रागीट स्वभावाच्या मुलींशी लग्न करणे टाळा
आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्याने अत्यंत रागीट स्वभावाच्या मुलीशी लग्न करणे टाळावे, कारण अशा मुलीमुळे घरात कलह निर्माण होऊ शकतो. अतिशय रागीट स्वभावाच्या मुलींचे बोलण्यावर नियंत्रण नसते. या स्वभावामुळे पती-पत्नीमध्ये तेढ निर्माण होऊ शकते.
स्वेच्छेने लग्न करणारी मुलगी निवडा
अनेक वेळा पालकांच्या दबावाखाली काही मुली लग्नासाठी तयार होतात. मुलीच्या इच्छेविरोधात लग्न केल्याने पुढे वैवाहिक संबंधात अडचणी येऊ शकतात. एखाद्याने नेहमी स्वेच्छेने लग्न करणारी मुलगी निवडली पाहिजे, जेणेकरून ती घर आणि नातेसंबंध चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल.