आचार्य चाणक्य यांनी यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य ही एक महान व्यक्ती होती. अनेक जण त्यांच्या नीतीचे अनुकरण करतात. आचार्य चाणक्य यांनी बुद्धिमान व्यक्तीचे काही गुण सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“प्रस्तावसदृशं वाक्यं प्रभावसदृशं प्रियम् । आत्मशक्तिसमं कोपं यो जानाति स पण्डितः॥” या श्लोकामधून चाणक्य सांगतात की, केव्हा काय बोलावे, कोणावर प्रेम करावे व किती राग करावा, या तीन गोष्टी ज्या व्यक्तींना माहिती असतात, त्या अत्यंत ज्ञानी व बुद्धिमान असतात.

हेही वाचा : Chanakya Niti : महिला नेहमी नोटीस करतात पुरुषांच्या ‘या’ सवयी, वाचा ‘चाणक्य नीती’ काय सांगते?

केव्हा काय बोलावे?

आचार्य चाणक्य सांगतात की, समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही व्यक्ती कोणताही विचार न करता काहीही बोलतात. अशा लोकांवर टीका केली जाते. याउलट जी माणसे विचारपूर्वक बोलतात त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याचे दिसून येते. त्यामुळे चाणक्य नीतीनुसार केव्हा काय बोलावे, हे माहीत असणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Chanakya Niti : बेस्ट फ्रेंडला चुकूनही सांगू नका ‘या’ पाच गोष्टी; भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम? वाचा, चाणक्य नीती काय सांगते…

कोणावर प्रेम करावे?

प्रत्येक व्यक्तीने योग्य व्यक्तीवर प्रेम करावे, असा सल्ला आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीद्वारे देतात. चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोणावर प्रेम करावे, याची जाण प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

किती राग करावा?

राग हा नेहमी घातक असतो. कारण- रागाच्या भरात अनेक लोक स्वत:चे नुकसान करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. त्यामुळे किती राग करावा, हे ज्या व्यक्तींना कळते, त्या व्यक्ती अत्यंत ज्ञानी व समजूतदार असतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti if you have these three qualities you are intelligent and lovable person read what acharya chanakya said ndj
Show comments