Chanakya Niti for Life: चाणक्य नीतीमध्ये यशस्वी जीवन मिळविण्याची युक्ती देखील सांगितली आहे, तसेच असे काही संकेत देखील सांगितली आहेत जी चांगल्या आणि वाईट काळ सुरू होण्यापूर्वी आढळतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहे की, आर्थिक संकट येण्याआधीच घरात काही संकेत मिळू लागतात. हे संकेत दुर्लक्षित करू नका आणि सावध रहा. आर्थिक संकटाचे संकेत देणार्या अशा लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
तुळशीचे रोप सुकणे : घरातील हिरवे तुळशीचे रोप अचानक सुकणे हे शुभ संकेत नाही. हे सांगते की तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय इतरही काही समस्या येऊ शकतात. अशा परिस्थितीत तुळशीचे सुकलेले रोप काढून नवीन रोप लावावे. त्याची रोज पूजा करा आणि सर्व काही चांगले होण्यासाठी इष्ट देवाला प्रार्थना करा.
आणखी वाचा : Chanakya Niti: जीवनात या गोष्टींना पाय लावू नका, आनंदाला लागेल गालबोट
घरात रोजची भांडणे : घरात रोज भांडणे होत असतील तर ते शुभ संकेत नाहीत. अशा घरात देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून पूजा करा.
आणखी वाचा : या ३ राशींच्या गोचर कुंडलीत बनलाय ‘पॉवरफुल’ बुद्धादित्य राजयोग, मिळेल अमाप पैसा आणि प्रतिष्ठा
दूध वारंवार सांडणे : घरात दूध रोज पडल्यास किंवा काच वारंवार फुटत असल्यास ते चांगले नाही. हे संकट येण्याचे संकेत देते. हे देखील आर्थिक अडचणीचे संकेत आहे.
घरातील लोकांची झोप कमी होणे : घरातील लोकांची झोप कमी होणे हे देखील चांगले संकेत नाही. हे सूचित करते की वास्तुदोष आर्थिक अडचणीत आणू शकतो.