Chanakya Niti for Success: यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्य यांनी यांनी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला आहे; ज्याच्यामुळे यश सहज शक्य आहे. आचार्य चाणक्यांची धोरणे नीट पाळली, तर माणूस हरलेली पैजही जिंकू शकतो. श्रीमंत होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक अहोरात्र मेहनतही घेतात. मात्र, मेहनतीचे फळ मोजक्याच लोकांना मिळते; तर काहींच्या पदरी निराशाच येते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर चाणक्य नीतीचा अवलंब केला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी चाणक्यांनी आपल्या धोरणात अशा दोन गोष्टी सांगितल्या आहेत की, ज्या माणसाने सोडायलाच हव्यात. मग चला तर, चाणक्यांनी सांगितलेल्या त्या दोन गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आचार्य चाणक्य आपल्या धोरणात म्हणतात की, मनुष्याने भूतकाळाबद्दल दु:खी होऊ नये किंवा शोक व्यक्त करू नये आणि नजीकच्या भविष्याची चिंताही करू नये. बुद्धिमान लोक वर्तमानात जगतात आणि त्यानुसार वागतात. ते म्हणतात की, भूतकाळाबद्दल शोक करून काहीही फायदा नाही आणि भविष्यात काय होणार आहे, याची चिंता करणे व्यर्थ आहे. या दोन कारणांमुळे माणूस आपले भविष्य उद्ध्वस्त करतो आणि त्याला यश कधीच मिळत नाही. जे लोक हुशार असतात, ते त्यांचे काम वर्तमानानुसार करतात आणि भविष्यात ते नक्कीच यशस्वी होतात.

(हे ही वाचा : ३०० वर्षांनी महाशिवरात्रीला ‘शुभ योग’ जुळून आल्याने ‘या’ राशींना होणार मोठा धनलाभ? महादेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत )

भूतकाळाबद्दल शोक करू नये, हे खरंतर आपल्याला चाणक्यांना समजावून सांगायचे आहे. भविष्य किती उज्ज्वल आहे हे माहीत असले तरीही एखाद्याने कधीही काळजी करू नये किंवा त्यावर विश्वास ठेवू नये. जर तुम्हाला खरोखरच यशस्वी व्हायचे असेल, तर सध्याच्या काळात जगायला शिका आणि त्यानुसार तुमचे काम करा, तरच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकाल. कारण- दुःख आणि चिंता यांनी वेढलेली व्यक्ती अंधारात बुडालेली असते. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर आजच्या दिवसाप्रमाणे तुमच्या कामाचे नियोजन करा आणि त्यात मनापासून गुंतून राहा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti if you stop thinking about these two things then no one can stop a person from being successful pdb