Chanakya Niti : चाणक्य हे एक महान व्यक्ती होती. त्यांचे विचार, नीती आजही अनेक लोक फॉलो करतात. चाणक्य हे अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये आर्थिक व्यवहार कसे असावे, याविषयी सांगितले आहे. चाणक्य नीतीनुसार श्रीमंत व्हायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या, जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • चाणक्य सांगतात की जर व्यक्तीला श्रीमंत व्हायचं असेल तर पैशांची बचत करणे खूप जास्त गरजेचे आहे पण कुठे पैसे खर्च करायचे आणि कुठे पैसे वाचवायचे, याविषयी व्यक्तीला ज्ञान असायला हवे.

हेही वाचा : स्वप्नात रामभक्त हनुमंत दिसण्याचा अर्थ काय? वाचा, स्वप्नशास्त्र काय सांगते?

  • चाणक्य नीतीमध्ये धन संपत्ती दान करण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्य सांगतात की पैसे दान केल्यानंतर पैसे कमी होत नाही तर पैशांमध्ये आणखी वाढ होते. चांगल्या कामात पैशांची गुंतवणूक करावी.
  • आचार्य चाणक्य म्हणतात की पैशांचा सदुपयोगही करणे, व्यक्तीला समजले पाहिजे. अति पैसा खर्च करू नये. विमा, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधीत योजनांमध्ये पैसे गुंतवावे. कठीण काळात हेच पैसे अनेकदा कामी येतात.

हेही वाचा : Name Astrology : ‘या’ अक्षरांपासून नाव असलेल्या व्यक्तींना मिळतो अपार पैसा, खरे प्रेम आणि मोठे यश; या यादीमध्ये तुमचे नाव आहे का?

  • अनेकदा पैसा कमवण्याच्या हाव्यासापोटी व्यक्ती चुकीच्या मार्गावर भकटू शकतो. त्यामुळे चाणक्य सांगतात की माणसाने पैशांचा लोभ करू नये आणि पैसा आल्यानंतर व्यक्तीने अहंकारही बाळगू नये. अहंकाराची नेहमी माती होते.
  • चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, संपत्ती नेहमी चांगल्या मार्गाने कमवावी. चुकीच्या मार्गाने कमवलेले पैसे जास्त दिवस टिकत नाही.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti if you want to be a rich then keep these things of acharya chanakya told ndj
Show comments