Chanakya Niti : प्राचीन भारतीय संस्कृत इतिहासात आचार्य चाणक्य आपल्या गुणांनी समृद्ध, राजनीतीचे पंडित, आचार विचारांचे मर्मज्ञ म्हणून लोकप्रिय आहेत. मौर्य काळात जेव्हा चंद्रगुप्त मौर्य शासक होते, तेव्हा चाणक्य हे राजनीतीचे गुरू होते. त्यांचे विचार, नीती आजही अनेक लोक फॉलो करतात. चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये माणसाने आयुष्य कसे जगावे, याविषयी सांगितले आहे. व्यक्तीचे आर्थिक व्यवहार कसे असावे, याविषयी स्पष्ट सांगितले आहे. श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावे, याविषयी चाणक्य यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
आचार्य चाणक्य काय सांगतात?
चाणक्य सांगतात की जर व्यक्तीला श्रीमंत व्हायचं असेल तर पैशांची बचत करणे खूप जास्त गरजेचे आहे. खूप जास्त पैसा खर्च करू नये. त्यामुळे कुठे पैसे खर्च करायचे आणि कुठे पैसे वाचवायचे, याविषयी व्यक्तीला ज्ञान असायला हवे आणि त्यानुसार पैसे खर्च करणे गरजेचे आहे.
चाणक्य नीतीमध्ये धन संपत्ती दान करण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्य सांगतात की पैसे दान केल्यानंतर पैसे कमी होत नाही तर पैशांमध्ये आणखी वाढ होते. त्यामुळे यापुढे पैसे दान करताना मागे पुढे पाहू नका. चांगल्या कामात नेहमी पैशांची गुंतवणूक करावी.
आचार्य चाणक्य म्हणतात की पैशांचा सदुपयोगही करणे, व्यक्तीला समजले पाहिजे. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करावी. अति पैसा खर्च करू नये. विमा, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधीत योजनांमध्ये पैसे गुंतवावे. कठीण काळात हेच पैसे अनेकदा कामी येतात.
अनेकदा पैसा कमवण्याच्या हाव्यासापोटी व्यक्ती चुकीच्या मार्गावर भकटू शकतो. त्यामुळे चाणक्य सांगतात की माणसाने पैशांचा लोभ करू नये आणि पैसा आल्यानंतर व्यक्तीने अहंकारही बाळगू नये. अहंकाराची नेहमी माती होते. माणसाने नेहमी नम्रपणे वागावे.
चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, संपत्ती नेहमी चांगल्या मार्गाने कमवावी. चांगले कर्म करून आणि मेहनतीचे पैसे कमवावे. चुकीच्या मार्गाने कमवलेले पैसे जास्त दिवस टिकत नाही. अशी संपत्ती कोणत्याही कामाची नसते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)