Chanakya Niti : आचार्य चाणक्य ही एक विद्वान व्यक्ती होती. त्यांनी चाणक्य नीतिद्वारे जीवनाच्या प्रत्येक पैलुंविषयी मार्गदर्शन केले. माणसाने जीवन जगताना कोणत्या नीती स्वीकारायला पाहिजे, याविषयी त्यांनी मते मांडली आहे. त्याना वेद, अर्थशास्त्र आणि विविध शास्त्रांचे ज्ञान गोते. नीतिशास्त्रासाठी ते खास ओळखले जाते. अनेक मोठ्या पदांवरील व्यक्ती चाणक्य यांच्या नीतिचे अनुकरण करताना दिसतात.
चाणक्य नीतितून त्यांनी माणसाच्या हितार्थ गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचं असते आणि जीवनात उंची गाठायची असते, त्या लोकांनी चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
कर्मायत्तं फलं पुंसां बुद्धि: कर्मानुसारिणी।
तथापि सुधियश्चार्याः सुविचार्यैव कुर्वते॥
हेही वाचा : Shukra Nakshatra Gochar 2024 : चार दिवसानंतर ‘या’ तीन राशींचे नशीब पालटणार, मिळणार बक्कळ पैसा?
चाणक्य सांगतात, कर्माचे फळ हे व्यक्तीच्या कर्मामध्ये लपलेले असते. माणसाची बुद्धी सुद्धा कर्मानुसार कार्य करते. ज्ञानी व्यक्ती विचार करून कोणत्याही कार्याला सुरुवात करतात पण विचार न करता जर तुम्ही कोणते कार्य करत असाल तर यश मिळत नाही. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी एक नीती तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्या नीतिनुसार काम करा. तुम्हाला निश्चित यश मिळेल.
चाणक्य सांगतात, माणसाला कर्मानुसार फळ मिळतात. त्यांच्या मते, कोणत्याही गोष्टीला चांगल्याने समजून त्यावर विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यावर कार्य करावे म्हणजेच कोणत्याही विचार न करता कार्य सुरू करणे चुकीचे आहे. जे काम तुम्ही सुरू करणार आहात त्याचा गंभीरपणे विचार करून त्याची तयारी करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : Navpancham Yog 2024 : १०० वर्षानंतर गुरू अन् केतू निर्माण करणार नवपंचम योग, ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
आयुष्यात निर्णय घ्यावे लागतात पण निर्णय घेताना परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे. लोक खूप घाईघाईने निर्णय घेतात त्यानंतर त्यांच्या पदरी वारंवार निराशा येते. जर तुम्ही एखादी योजना तयार करून त्यावर काम करत असाल, तर तुम्हाला कळते की तुम्ही हे काम का करत आहात आणि त्याचा परिणाम काय होणार आहे. एकदा मनाने कोणती गोष्ट स्वीकारली तर कितीदा निराशा येऊ द्या, माणसाची हिंमत कोणीही तोडू शकत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना आधी विचार करा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)