Chanakya Niti : माणसाने निर्जीव वस्तूंपासूनही जीवन जगण्याचा बोध घ्यावा असं म्हणतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतींमध्ये मुक्या प्राण्यांपासून अनेक गोष्टी शिकण्याचे आवाहन केले आहे. चाणक्य यांच्या मते, प्राण्यांना जरी बोलता येत नसेल तरी प्राण्यांचे गुण माणसाने आत्मसात करावे.चाणक्य सांगतात , गाढवापासून माणसाने तीन गोष्टी शिकायला पाहिजे. त्या तीनगोष्टी कोणत्या? जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्याही परिस्थितीचा सामना कराव

गाढव ज्याप्रमाणे उन्हात, थंडीत आणि पावसात राबत असतो तसेच माणसानेही कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा आणि जीव ओतून मेहनत करावी. यशाच्या मार्गावर जाताना अनेक अडचणी येतील, पण घाबरू नये. चाणक्य सांगतात, अडचणींपासून माणसाने भरपूर काही शिकावे आणि स्वत:ची क्षमता ओळखावी.

आळस करू नये

आळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हणतात. आळस माणसाला यशापासून दूर ठेवतो, असे चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे. गाढव कितीही थकले असले तरी पाठीवर ओझे वाहत असतो. त्यामुळे मन लावून कोणतेही काम पूर्ण करावे आणि आळस करू नये.

समाधानी असावे

आनंद हा विकत घेता येत नाही. जर माणूस समाधानी असेल, तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद हा आपोआप येतो. चाणक्य यांच्या मते समाधानी व्यक्ती समजूतदारपणे आणि सयंमाने कोणत्याही परिस्थितीत काम करतो. त्यामुळे गाढवाप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नये.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti learn these things from donkey acharya chanakya said ndj