Chanakya Niti for Friend : आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार बहुतेक लोकांना कठोर वाटतात, परंतु त्यांचे शब्द हे जीवनाचे खरे सत्य आहे. आजच्या युगात चाणक्यांची शिकवण आपल्याला आपल्या विरोधकांशी लढण्यास मदत करते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या शिष्यांना अशा काही स्वभावाच्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला आयुष्यभर त्रास होऊ शकतो.
आचार्य चाणक्य म्हणतात, ‘खोट्या माणसाला कधीही मित्र बनवू नका. खोटं बोलणारी व्यक्ती आपला दृष्टिकोन सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकते. खोटं बोलणारा जगात कोणाचाही होऊ शकला नाही आणि होणार नाही.’
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार माणसाने नेहमी विचार करूनच मित्र बनवावे. एक चांगला मित्र तो असतो जो तुम्हाला नेहमी सत्य सांगतो. सत्य एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे कोणतंही नातं दीर्घकाळ टिकतं.
आणखी वाचा : Chanakya Niti: या ५ लोकांशी कधीही शत्रुत्व करू नका; तुमचा नेहमीच पराभव होईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल!
खोटं फार काळ टिकत नाही
कधीकधी असं होतं की एखादी व्यक्ती खोटं बोलते. एक खोटं बोलण्याने काही होत नाही, असा विचार करून सांगणाऱ्या व्यक्तीला ते योग्य वाटू लागतं. पण समोरच्यालाही ते योग्य वाटेलच असं नाही. त्यावेळी सांगितलेलं खोटं कदाचित सुरुवातीला तुमच्या बाजूने असेल, पण ते जास्त काळ टिकणार नाही.
खोट्याचा आधार कमकुवत असतो
चाणक्य नीतिनुसार खोट्याचा आधार नेहमीच कमकुवत असतो. खोटं बोलण्याने एका फटक्यात नातं तुटू शकतं. म्हणूनच माणसाने मैत्रीत किंवा कोणत्याही नात्यात अजिबात खोटं बोलू नये. खोटं बोलणं तुम्हाला क्षणभर आनंदी करू शकतं, परंतु ते समोरच्याला अडचणीत आणू शकतं.
(टीप: येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)