Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतातील महान विद्वानांपैकी एक होते. ते त्यांच्या नीतीशास्त्रासाठी ओळखले जातात. अनेक लोक त्यांच्या नीती फॉलो करतात. आचार्य चाणक्य यांनी राजकारण, व्यवसाय, आणि वैयक्तिक जीवनाविषयी अनेक नीती सांगितल्या आहेत. चाणक्य सांगतात की आपण काही गोष्टी कधीच कुणाला सांगू नये. त्या गोष्टी कोणत्या, जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैयक्तिक गोष्टी

चाणक्य सांगतात की कधी चुकूनही कुणाला आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगू नये. विशेषत: पती पत्नीने आपल्या नात्यातील चढ उतार कधीच कुणाजवळही शेअर करू नये. या अत्यंत वैयक्तिक गोष्टी नेहमी गोपनीय ठेवाव्यात. इतर कोणालाही तुम्ही या गोष्टी सांगितल्या तर ते लोक भविष्यात याचा गैरफायदा घेऊ शकतात.

हेही वाचा :Chanakya Niti : महिला नेहमी नोटीस करतात पुरुषांच्या ‘या’ सवयी, वाचा ‘चाणक्य नीती’ काय सांगते?

गुप्त दान

चाणक्य नीतीनुसार, जर तुम्ही एखादे गुप्त दान केले असेल तर त्याविषयी कुणालाही सांगू नका. दान करणे पुण्याचे काम आहे त्यामुळे या गोष्टी कुणालाही सांगू नये नाहीतर तुम्ही केलेले दान व्यर्थ जाणार.

वय

चाणक्य नीतीच्या मते, खरे वय कुणालाही सांगू नये. असे केल्याने तुम्ही इतरांच्या तुलनेत आणखी निरोगी आणि तरुण दिसणार आणि कुणीही तुम्हाला कमकूवत समजणार नाही.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti never tell anyone these three things read what acharya chanakya said ndj
Show comments