आचार्य चाणक्य त्यांच्या नीती शास्त्रासाठी ओळखले जातात. त्यांच्या नीती अनेक लोक फॉलो करतात. असं म्हणतात की त्यांच्या नीती फॉलो केल्या तर व्यक्ती प्रत्येक अडचणीतून मार्ग काढू शकतो आणि सुखी जीवन जगू शकतो.
चाणक्य नीतीच्या मते, आपल्या प्रिय मित्राला काही गोष्टी कधीच चुकूनही सांगू नये, आज आपण त्या गोष्टी कोणत्या, हे जाणून घेणार आहोत.
स्वत:चे सीक्रेट सांगू नये
चाणक्य सांगतात की जर तुमचे एखादे सीक्रेट असेल तर ते कोणालाही सांगू नये. तुमच्या जवळच्या प्रिय मित्रालाही कधीच आपले सीक्रेट सांगू नये कारण या गोष्टी उघडकीस आल्यानंतर भविष्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो.
अपमानाविषयी सांगू नये
चाणक्य नीतीनुसार जर कधी तुमचा अपमान झाला असेल, तर ही गोष्ट कधीच कुणाला सांगू नये. चाणक्य सांगतात की जर तुम्ही तुमच्या अपमानाविषयी इतरांने सांगितले तर तुमचा बाकी असलेला स्वाभिमानही नष्ट होतो.
हेही वाचा : Chanakya Niti : महिला नेहमी नोटीस करतात पुरुषांच्या ‘या’ सवयी, वाचा ‘चाणक्य नीती’ काय सांगते?
नवरा बायकोमधील वादविवाद सांगू नये
नवरा बायको मध्ये लहान मोठे वादविवाद होत असतात. त्यामुळे हे वादविवाद एकमेकांपर्यंतच मर्यादीत ठेवावेत. कधी चुकूनही नवरा किंवा बायको बरोबर झालेला वाद किंवा भांडणाविषयी जवळच्या प्रिय मित्राला सांगू नये कारण ही वैयक्तिक गोष्ट आहे. यामुळे समाजात नवरा बायकोचा मान सन्मान कमी होऊ शकतो.
स्वत:मध्ये असणारी कमतरता सांगू नये
प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले वाईट गुण असतात. काही लोकांमध्ये काही गोष्टींची कमतरता असते. ही कमरता कधीच प्रिय मित्राला सांगू नये, असे चाणक्य सांगतात. जर तुमच्यातील कमतरता इतरांना माहिती झाली तर अनेक लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात.
हेही वाचा :Chanakya Niti : ‘या’ तीन गोष्टी कधीही कुणालाही सांगू नका; वाचा, चाणक्य नीती काय सांगते?
आर्थिक गोष्टी सांगू नये
आपल्या आर्थिक गोष्टी कधीच कुणालाही सांगू नये. चाणक्य नीतीनुसार जर तुमच्याजवळ भरपूर पैसा असेल तर कितीही जवळचा व्यक्ती असेल त्याला सांगू नये किंवा कधी तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तरीसुद्धा कुणालाही सांगू नये.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)