Chanakya Niti For A Successful Life : आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीशास्त्रामुळे जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी अर्थशास्त्रासह अनेक प्रमुख विषयांवर लिखाण केले आहे. इतिहासकारांच्या मते, आचार्य चाणक्य हे कुशल राजकारणी, मुत्सद्दी आणि महान विद्वान होते. कुशल राजकारण करत त्यांनी चंद्रगुप्त मौर्यच्या साम्राज्याची स्थापना आणि विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावली. पण, त्यांचे विचार आजही समर्पक आहेत. यात नीतिमूल्यांचे पालन करत कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनायचे असेल, तर या चार गोष्टींचे पालन करावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) दान

आचार्य चाणक्य यांच्या मते, दान करणारी व्यक्ती जीवनात नेहमी आनंदी राहते. धर्मग्रंथांमध्येही दानाचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे गरिबीही दूर होते. त्यामुळे व्यक्तीने आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार दान करावे. दान केल्याने संपत्ती कमी होत नाही, असेही धर्मपंडित सांगतात.

२) वागणूक

नीतीशास्त्राचे लेखक आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाच्या जीवनातील सर्व संकटे आणि कष्ट योग्य आचरणाने दूर केली जाऊ शकतात. चांगल्या आचरणाने माणूस स्वतःला उन्नत करू शकतो. चांगल्या आचरणामुळे व्यक्ती त्याच्या करियर आणि व्यवसायातदेखील यशस्वी होतात. यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व दु:ख, संकटे दूर होतात.

३) अभ्यास

इंटरनेटच्या युगात लोकं पुस्तके वाचणे विसरत आहेत. मात्र, आचार्य चाणक्य म्हणतात की, अभ्यासाने बुद्धिमत्ता वाढते. यामुळे माणूस आयुष्यात योग्य निर्णय घेण्यात यशस्वी होतो. यासाठी रोज अभ्यास करा.

४) भक्ती

माणसाचे नशीब आधीच लिहिलेले असते. पण, एखादी व्यक्ती देवाची उपासना करून आपले नशीब बदलू शकते. यामुळे व्यक्तीची तार्किक शक्ती म्हणजेच विचार करण्याची क्षमता वाढते. त्याच वेळी देवाचे आशीर्वाद त्या व्यक्तीवर सदैव राहतात.