आचार्य चाणक्य यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. त्यांच्या नीतीशास्त्रात व्यक्तीचे आचरण, स्वभाव याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. चाणक्य यांच्या धोरणांचे पालन करून एक सर्वसामान्य व्यक्ती जीवनात यशाचे शिखर गाठू शकते. जर तुम्ही अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राचे निर्माते आचार्य चाणक्य यांना मानत असाल, तर त्यांनी आयुष्यात अशा पाच लोकांना कधीही न दुखावण्याबद्दल सांगितले आहे. तसेच त्यांची देवाप्रमाणे सेवा केली पाहिजे आणि त्यांचा कधीही अपमान होता कामा नये म्हणून खबरदारी घेण्यास त्यांनी सांगितले आहे. आपण जाणून घेऊ कोण आहेत या पाच व्यक्ती …
जनिता चोपनेता च यस्तु विद्या प्रयच्छति ।
अन्नदाता भयत्रता पंचाईते पितृः स्मृता ।
१) वडील
आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीशास्त्रानुसार जन्म देणार्या व्यक्तीला जनक म्हणजेच पिता म्हणतात. आई-वडील हे पृथ्वीवरील देवाची रूपे आहेत. म्हणूनच वडिलांची सेवा आणि आदर केला पाहिजे. त्यांची सेवा आणि पूजा केल्याने व्यक्ती जीवनात खूप यशस्वी होऊ शकते. दुसरीकडे जी व्यक्ती आपल्या वडिलांचा अपमान वा अनादर करते ती व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाही.
२) गुरू
आचार्य चाणक्य यांच्या मते- जी व्यक्ती ज्ञान देते, ती शिक्षक असते. गुरूशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. त्यामुळे गुरूला पितृ म्हणजेच वडिलांचा दर्जा दिला जातो. त्यामुळे गुरूचा अपमान करू नये. गुरूच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याने व्यक्तीला जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते.
३) कुल पंडित
आचार्य चाणक्य यांच्या मते, यज्ञोपवीत संस्कार करणाऱ्या कुटुंबातील पुजार्याचा कधीही अपमान करू नये. सनातन धर्मात यज्ञोपविताला महत्त्वाचे स्थान आहे. यज्ञोपवीत हादेखील १६ विधींपैकी एक आहे. यज्ञोपवीत करणार्या पंडिताला नेहमी प्रसन्न ठेवावे आणि त्याचा आशीर्वाद घ्यावा.
४) अन्नदान करणारा
आचार्य चाणक्य यांच्या मते, अन्नदान करणारी व्यक्तीही पित्याच्या स्थानी असतो. अन्नदान करणाऱ्या व्यक्तीची नेहमी सेवा करावी. त्यांचा अपमान होता कामा नये. आपल्या कार्यातून अन्न देणार्या व्यक्तीला सदैव प्रसन्न ठेवायला हवे.
५) भयमुक्त व्यक्ती
आचार्य चाणक्य यांच्या मते- जी व्यक्ती भयमुक्त राहते, तीदेखील पित्यासारखा असते. अशा लोकांची नेहमी सेवा केली पाहिजे. त्यांचा कधीही अपमान करू नका. जर तुम्ही नकळत अशा एखाद्या व्यक्तीचा अपमान केला असेल, तर लवकरात लवकर त्या व्यक्तीची माफी मागा.