वडिलधारी मंडळी नेहमीच सल्ला देतात की, कठीण प्रसंगासाठी काही पैसे साठवून ठेवावेत, म्हणजे कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही. म्हणूनच लोक अनेक प्रकारे पैसे गुंतवतात. पण घरच्या आणि आपल्या गरजा सोडून काही ठिकाणी खुलेपणाने पैसा खर्च करावेत. या ठिकाणी पैसा खर्च केल्याने माणसांची संपत्ती कमी होत नाही, उलट वाढते. महान अर्थतज्ञ आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये पैसे कमवण्याचे, खर्च करण्याचे, बचत करण्याचे योग्य मार्ग सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गोष्टींसाठी खुलेपणाने पैसे खर्च करा
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा काही ठिकाणांबद्दल आणि परिस्थितींबद्दल सांगितले आहे, जिथे व्यक्तीने पैसे खर्च करण्यात कसूर करू नये, तर त्याने मनमोकळेपणाने पैसे खर्च केले पाहिजेत. यामुळे त्याच्या जीवनात सुख-समृद्धी वाढते, त्याला सन्मान आणि प्रगती मिळते.

आणखी वाचा : Chanakya Niti: असे लोक कोणाच्याही प्रेमास पात्र नसतात, प्रत्येकजण त्यांचा द्वेष करतो

आचार्य चाणक्य म्हणतात की गरीब, असहाय्य, गरजूंच्या मदतीसाठी कधीही पैसे खर्च करणे थांबवू नका. अशा लोकांना अन्न, शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी तुम्ही जो काही खर्च कराल ते उत्तम. शक्य असल्यास, आपल्या उत्पन्नाचा ठराविक भाग नेहमी या लोकांवर खर्च करा.

चाणक्य नीति सांगते की, या धर्मात केलेली सत्कर्मे पुढील अनेक जन्मांपर्यंत व्यक्तीसोबत राहतात, त्यामुळे त्याने जास्तीत जास्त पुण्य कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, पैसे दान करावे. यामुळे त्याच्या आयुष्यात खूप आनंद आणि समृद्धी येते.

आणखी वाचा : Chanakya Niti: सुखी वैवाहिक जीवन हवे असेल तर पती-पत्नीने करावे हे काम, प्रेम कधीच संपणार नाही!

तसेच समाजाशी निगडीत कामात गुंतवलेले पैसे माणसाला खूप सन्मान आणि प्रगती मिळवून देतात. व्यक्ती समाजात राहते, त्यातून अनेक फायदे घेतात, त्यामुळे समाजाप्रती त्याच्या काही जबाबदाऱ्या असतात, ज्या त्याने पूर्ण केल्या पाहिजेत. आपले पैसे सामाजिक कार्यात द्यावेत.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti says without hesitation spend money in these places and your wealth will increase prp