आचार्य चाणक्य यांच्या नीती जगप्रसिद्ध आहेत. अनेक राजकारणी, व्यावसायिक त्यांच्या नीती फॉलो करतात. चाणक्य नीती सांगते, माणसाने पैसा नेहमी जपून वापरावा आणि योग्य ठिकाणी खर्च करावा. चाणक्य अर्थशास्त्रमध्ये तज्ज्ञ होते. त्यामुळे चाणक्य सांगतात की, काही ठराविक ठिकाणी पैसा खर्च केल्यामुळे तुमची तिजोरी कधीच रिकामी होत नाही.
आज आपण याविषयी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. धार्मिक स्थळ

धार्मिकस्थळी दान करताना पैशाचा विचार करू नये. पवित्र स्थानी दान केल्यानंतर पुण्य मिळते, असे चाणक्य सांगतात. धार्मिकस्थळी जो पैसा जमा केला जातो त्या पैशातून भक्त, गरजू लोकांना अनेक सुविधा दिल्या जातात आणि गरिबांना अन्नदान केले जाते.

हेही वाचा : Shravan 2023 : महादेवाला प्रिय आहेत ‘या’ तीन राशी, या लोकांवर नेहमी असते शंकराची कृपा

२. गरजू आणि गरीब लोकांसाठी पैसा खर्च करा

गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असावे. चाणक्य नीती सांगते की, अन्न, वस्त्र किंवा शिक्षणासाठी गरीब आणि गरजू लोकांवर पैसा खर्च केल्यामुळे तुमची तिजोरी कधीच रिकामी होत नाही, देव तुम्हाला तुमच्या चांगल्या कामाचे फळ देते.

३. सामाजिक कार्य

चाणक्य सांगतात की, माणसाने आपल्या कमाईतून काही पैसे समाजासाठी दान केले पाहिजे. समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी चांगले कार्य करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : गणपतीबाप्पाकडून शिका या बहुमूल्य गोष्टी; जीवनात कधीच राहणार नाही दु:खी

४. आजारपण

चाणक्य नीती सांगते, जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात, तर आजाराने त्रासलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी. अनेकदा पैसे नसल्यामुळे अनेक लोकांना आजारांवर योग्य उपचार करता येत नाही.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti spend more money here your vault will never be empty read what chanakya said ndj