Chanakya Niti For Success: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्रासह जीवनाच्या विविध पैलूंवर बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आचार्य चाणक्य यांनी मानवाच्या कल्याणाबाबतचे त्यांचे विचार श्लोकांच्या माध्यमातून मांडले आहेत. यश मिळविण्यासाठी चाणक्यांचे धोरण रामबाण उपाय मानले जाते. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आचार्य चाणक्य यांचे धोरण पुढीलप्रमाणे

कर्मायत्तं फलं पुंसां बुद्धि: कर्मानुसारिणी।

तथापि सुधियश्चार्याः सुविचार्यैव कुर्वते॥

आचार्य चाणक्य आपल्या नीतीमध्ये कर्माबद्दल स्पष्टीकरण देताना म्हणतात की, कर्माचे फळ व्यक्तीच्या कृतीत राहते. मानवी बुद्धीदेखील कर्मानुसार कार्य करते. तरीही शहाणी माणसे नीट विचार करूनच कोणतेही काम सुरू करतात. विचार न करता, कोणतेही काम केल्यास यश मिळणार नाही. कोणतेही काम करण्यापूर्वी चांगले धोरण बनवा आणि मग त्या कामात गुंतून राहा, यश नक्कीच मिळेल, असे ते सांगतात.

(हे ही वाचा : १२ महिन्यांनी शनिदेवाच्या राशीत शुक्रदेव येताच ७ मार्चपासून ‘या’ राशींना मिळणार पैसा? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी )

काहीही करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा

चाणक्य म्हणतात की, मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून मूल्यमापन करूनच कामाचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणतात. एकूणच विचार न करता, कोणतेही काम अचानक सुरू करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण जे काही काम करणार आहोत, त्याचा आधी गांभीर्याने विचार करा आणि ते काम योग्य तयारीने केले तर बरे.

जीवनात निर्णय घेणे महत्त्वाचे आहे; पण त्यासाठी विचारपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. घाईघाईने निर्णय घेणारी माणसे प्रत्येक पावलावर निराश होतात; तर कुठलेही काम चोख नियोजन करून केले, तर हे काम मी का करतोय आणि त्याचे फळ काय असेल, हे मनाशी स्वीकारले जाते. एकदा मनाने एखादी गोष्ट स्वीकारली की, माणूस कितीही वेळा निराश झाला तरी त्याची हिंमत खचत नाही. मनाने हरणारे पराभूत होतात आणि मनाने जिंकणारे विजयी होतात, असेही ते म्हणतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti success tips for short time period know shortcuts to immediate success pdb