Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. चाणक्यनीतीमध्ये त्यांनी अनेक विषयांची सविस्तर चर्चा केली आहे. आचार्य चाणक्या यांनी मानवाच्या कल्याणाबाबतचे त्यांचे विचार श्लोकांच्या माध्यमातून मांडले आहेत. यश मिळविण्यासाठी चाणक्याचे धोरण रामबाण उपाय मानले जाते. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, इतरापेक्षा चार पावले पुढे राहायचे असेल तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् । छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः ॥

behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
RSS Mohan Bhagwat, pune,
देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Surya ketu yuti 2024 | Surya ketu yuti 2024 marathi news
Surya ketu yuti 2024 : १८ वर्षानंतर ग्रहांचा राजा सूर्याची केतुबरोबर होईल युती! ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळेल अपार धनलाभ
Chanakya Niti These 5 things men should never tell anyone
Chanakya Niti : पुरुषांनी या ५ गोष्टी अजिबात कोणालाही सांगू नयेत, नाहीतर आयुष्यभर लोक तुमच्यावर हसतील
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद

अर्थ- आचार्य चाणक्य सांगतात, एखाद्या व्यक्तीचा जास्त साधेपणा देखील घशात अडकलेल्या हाडाप्रमाणे असत जे गिळता येत नाही आणि बाहेप काढता येत नाही. म्हणजेच अशा व्यक्तीला चांगुलपणा सोडताही येत नाही आणि साधेपणामुळे होणारा त्रास सहन करावा लागतो. करण साध्या भोळ्या व्यक्तीचा इतर लोक फायदा घेतात.

उदाहरणार्थ, चाणक्य सांगतात की, जंगलात सुरुवातीला सरळ झाडे तोडले जाते, कारण वाकड्या झाडांच्या तुलनेत सरळ झाडे तोडण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. त्याच प्रमाणे चांगल्या व्यक्तीच्या माणसाच्या साधे भोळेपणाचा फायदा सर्वजण घेतात, त्यामुळे या कलियुगात यश मिळावायचे असेल तर त्यामुळे थोडी हुशारी आवश्यक आहे.


हेही वाचा – ‘अशा’ स्त्रीबरोबर लग्न कराल, तर उजळेल नशीब; कशी असावी पत्नी? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

कः कालः कानि मित्राणि को देशः कौ व्ययागमौ ।कश्चाहं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुहुः ॥

अर्थ- तुम्हाला तुमचे भविष्य सुधारायचे असेल, तर तुम्ही योग्य वेळ, योग्य मित्र, योग्य ठिकाण, पैसे कमवण्याचे योग्य साधन, पैसा खर्च करण्याचा योग्य मार्ग आणि तुमचा उर्जा स्त्रोत याकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे तुम्हाला प्रत्येक मार्गावर यश मिळेल.

यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।ध्रुवाणि तस्य नश्यन्ति चाध्रुवं नष्टमेव हि ॥

अर्थ- चाणक्‍याने या श्लोकात म्हटले आहे की, ”जो माणूस सर्व काही मिळवण्याचा लोभ असतो, त्याच्याकडी चांगली गोष्ट देखील तो गमावतो. जो माणूस निश्चित म्हणजे योग्य गोष्ट सोडून अनिश्चित म्हणजे अयोग्य गोष्टीचा आधार घेतो, त्याच्याकडील चांगल्या गोष्टी देखील नष्ट करतो. म्हणूनच जेव्हाही तुम्ही कोणताही निर्णय घ्याला तेव्हा योग्य-अयोग्य याची खात्री करा.

हेही वाचा – वडील आणि मुलामध्ये नाते कसे असावे? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

गुणैरुत्तमतां याति नोच्चैरासनसंस्थितः। प्रासादशिखरस्थोऽपि काकः किं गरुडायते॥

अर्थ- चाणक्य सांगतात की, माणसाला त्याच्या कर्तृत्वाने आणि गुणांमुळे श्रेष्ठ म्हटले जाते. त्यांनी सांगितले की, शिकलेला माणूस कदाचित गरीब असू शकतो पण श्रीमंतांमध्येही तो आदरणीय मानला जातो. पैसा, संपत्ती, पद याने माणूस मोठा होत नाही, आपल्या चांगल्या गुणांमुळे मोठा होतो. उदाहरणार्थ महालाच्या शिखरावर कावळा बसला तर तो गरुड होत नाही. तो कावळाच राहतो.