पती-पत्नीचे नाते हे जितके भावनिक असते तितके नाजूकही असते. या नात्यात दोघांचा एकमेकांवर विश्वास असावा लागतो. दोघांनी एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेऊ नये, खोटं बोलू नये. पण, वैवाहिक जीवन दीर्घकाळ टिकवण्यासाठी पती-पत्नीला काही गोष्टींची जबाबदारी एकट्यानेच उचलावी लागते. पण, काही गोष्टी लपवून ठेवणेही अनेकदा महत्वाचे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमधील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या पतीने पत्नीसोबत शेअर करू नयेत. यामुळे नातं तर कमकुवत होतंच, पण घरात सतत भांडणंही होत राहतील.

१) अपमानाबद्दल बोलणे टाळा

कोणतीही स्त्री आपल्या पतीचा थोडासा अपमानही सहन करू शकत नाही. पत्नीला कोणी आपल्या पतीचा अपमान केला हे जर समजले, तर तिच्या मनात लगेच सूडाची आणि रागाची भावना निर्माण होते. अशा परिस्थितीत पत्नीला कोणत्याही नात्याची पर्वा राहत नाही, यावेळी भावनेच्या भरात पत्नी आपल्या पतीसाठी कोणालाही उलट बोलतात. म्हणून वैवाहिक आयुष्यात शांतता हवी असेल तर पतीने आपल्या पत्नीला कोणाकडूनही झालेल्या अपमानाबद्दल कधीही सांगू नये.

२) खरी कमाई

शहाणा माणूस आपल्या पत्नीला त्याची खरी कमाई सांगण्याची चूक कधीच करत नाही. चाणक्य नीतीनुसार, जर पत्नी समजूतदार नसेल तर ती कमी कमाई करणाऱ्या आपल्या पतीचा आदर करत नाही, तसेच ती पतीला नेहमी टोमणे मारत राहते. त्याच वेळी जर तिला तिच्या पतीच्या उच्च कमाईबद्दल माहिती असेल तर ती खूप खर्च करू लागते.

३) दान केलेली रक्कम

शास्त्रात असेही सांगितले आहे की, खरे दान तेच आहे जे केल्यानंतर तुमच्याशिवाय इतर कोणालाही माहिती पडत नाही. पण, चाणक्य नीतीमध्ये हे एका वादाचे कारणही म्हटले आहे. कारण तुमचा जोडीदार कंजूष किंवा लोभी असेल तर दानाबद्दल कळल्यावर तो तुमच्याशी भांडू शकतो. त्यामुळे पती-पत्नीने कधीही एकमेकांना दानाबद्दल सांगू नये.

४) तुमची कमजोरी

पतीने आपल्या पत्नीला त्याच्या कमकुवतपणाबद्दल कधीही सांगू नये. कारण अनेक वेळा स्त्रिया नकळत इतरांसमोर त्याचा उल्लेख करतात. याशिवाय जर पत्नी दुष्ट असेल तर ती स्वतः त्याचा फायदा घेऊ लागते.