Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी रचलेल्या चाणक्य नीतीला समाजजीवनात विशेष महत्त्व आहे. चाणक्य नीतीमध्ये यशस्वी जीवनासाठी विविध गुणांचे सविस्तर वर्णन केले आहे. याशिवाय आचार्य चाणक्य यांनी हे देखील सांगितले आहे की, जीवनात यश मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला, चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या व्यक्तीच्या एका गुणाबाबत जाणून घेऊ, जो कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो.
आचार्य चाणक्यांनी सांगितला यशाच गुरुमंत्र
यद् दूरं यद् दुराराध्यं यच्च दूरे व्यवस्थितम्।
तत्सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम्।।
म्हणजे, एखादी वस्तू कितीही दूर असली किंवा ती शोधणे कितीही कठीण असले किंवा ती एखाद्याच्या आवाक्याबाहेर असेल, पण जर व्यक्तीची कठोर तपश्चर्या आणि कठोर परिश्रम करायची तयारी असेल तर तो ते साध्य करू शकतो. म्हणूनच कठोर परिश्रम ही सर्वात शक्तिशाली गोष्ट मानली जाते.
हेही वाचा – चाणक्य निती : अशा पुरुषांकडे आकर्षित होतात महिला! कसा असावा जोडीदार? जाणून घ्या
चाणक्य नीतीच्या या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, जीवनात असे अनेक प्रसंग येतात, जे पार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधीकधी यश मिळणे अशक्य वाटते, पण यश मिळवण्यासाठी मेहनत हीच महत्त्वाची गोष्ट मानली जाते. परिश्रम केवळ ध्येय साध्य करण्याचा मार्ग सोपा करत नाही, तर प्रगतीच्या नवीन संधीदेखील देतात.
हेही वाचा – व्यक्तीने ‘या’ तीन परिस्थितींमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा…; जाणून घ्या, काय सांगते चाणक्य नीती ….
एखाद्या व्यक्तीला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर त्याची कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला कितीही अडचणी आल्या, कितीही वेळा अपयश आले तरी सातत्याने मेहनत करत राहिला तर एक दिवस त्याला यश नक्की मिळते; अशी शिकवण आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीग्रंथामध्ये दिली आहे.