Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे जगातील महान विद्वान मानले जातात. त्यांनी लिहिलेली चाणक्य नीती सध्या लाखो तरुण वाचत आहेत. आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्र, रणनीती आणि राजकारण अशा अनेक विषयांसाठी ओळखले जातात. यासोबतच त्यांनी अनेक साधे श्लोक रचले, जे व्यक्तिमत्त्व घडवण्यास सोपे होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, ”व्यक्तीने स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी दृढ संकल्प केला पाहिजे. चाणक्य नीतीनुसार ‘या’ चार ठिकाणी राहणे कोणत्याही व्यक्तीसाठी मूर्खपणा ठरू शकतो? जाणून घ्या कोणते आहेत हे स्थान.
चाणक्यनितीनुसार, कोणत्याही व्यक्तीने या चार ठिकाणी नाही राहिले पाहिजे
”यस्मिन् देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बान्धवाः ।
न च विद्यागमोऽप्यस्ति वासस्तत्र न कारयेत् ।।”
अर्थ- ज्या देशात आदर नाही, जिथे उत्पानाचे साधन नाही, जिथे कोणी आपले नाही, त्याचबरोबर ज्या ठिकाणी शिक्षण घेणे शक्य नाही अशा ठिकाणी माणसाने कधीही राहू नये.
हेही वाचा – धनलाभ झाल्यानंतर करू नका ‘या’ चुका अन्यथा…. जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
प्रथम ठिकाण – आचार्य चाणक्य या श्लोकाद्वारे सांगत आहेत की, जिथे व्यक्तीला, महिलांना आणि वृद्धांचा आदर होत नाही. अशा ठिकाणाला कधीही राहू नये. कारण अशा ठिकाणी संपूर्णपणे गोंधळाची स्थिती असते आणि बेशिस्त लोक राहतात.
दुसरे ठिकाण– आचार्य चाणक्य पुढे सांगतात की, जेथे उपजीविकेचे साधन नाही अशा ठिकाणी राहणे देखील मूर्खपणासारखे आहे. अशा ठिकाणी पैशाच्या देवाणघेवाण करता येत नाही आणि इतर सुविधांचा अभाव असतो.
तृतीय ठिकाण – ज्या ठिकाणी कोणीही जाणकार किंवा कुटुंबातील कोणीही व्यक्ती राहत नाही, अशा ठिकाणी राहू नये. कारण कधी कधी आयुष्यात संकटे येतात तेव्हा ते तुमच्या सर्वात जवळ असतात आणि प्रत्येक सुख-दु:खात तुमच्याबरोबर असतात.
चतुर्थ ठिकाण – चाणक्य धोरणानुसार ज्या ठिकाणी शिक्षण किंवा अभ्यासाचे कोणतेही साधन नाही अशा ठिकाणी राहणे हाही मूर्खपणाच आहे. या ठिकाणी अज्ञानाचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.