आचार्य चाणक्य हे एक महान तत्त्वज्ञ, राजकारणी व मुत्सद्दी होते. अखंड भारताच्या निर्मितीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांना कौटिल्य, असेही म्हटले जाते. इतिहासकारांच्या मते, चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवण्यातही आचार्य चाणक्य यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यासाठी आचार्य चाणक्यांनी अनेकदा चंद्रगुप्त मौर्य यांची परीक्षाही घेतली. त्यांनी आपल्या हयातीत अनेक प्रमुख धर्मग्रंथांची रचना केली. त्यापैकी नैतिकता हा त्यांचा सर्वांत लोकप्रिय ग्रंथ आहे. याच आचार्य चाणक्य यांनी जीवनात यशस्वी होण्याची सूत्रे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते, जगात तीन प्रकारचे लोक असतात; जे आयुष्यभर नेहमी आनंदी राहतात, एखाद्या राजाप्रमाणे ते आपले जीवन जगतात. हे लोक कोण ते जाणून घेऊ …
१) आज्ञाधारी मुलगा
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीचा पुत्र त्याच्या सर्व आज्ञा अर्थात गोष्टी ऐकतो, त्याला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख मिळू शकते. जर एखाद्याने आपल्या वडिलांची सेवा केली त्यांचा आदर केला तर त्या व्यक्तीला जीवनात कसलीही कमतरता भासणार नाही तो आयुष्यभर नेहमी आनंदी राहू शकतो आणि राजासारखे जीवन जगू शकतो.
२) पवित्र स्त्री
आधुनिक काळात पवित्र महिलांचे महत्त्व वाढले आहे. क्वचितच एखाद्याला आज्ञाधारक पत्नी मिळते. आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीला आज्ञाधारक पत्नी मिळते; तो एक भाग्यवान माणूस आहे. समजा, त्याला स्वर्गात स्थान मिळाले आहे. पती-पत्नीचे विचार सारखेच असतील किंवा जुळत असतील, तर कुटुंबाचा विकास वेगाने होऊ शकतो.
३) दान करणारी व्यक्ती
आचार्य चाणक्य यांच्या मते, पैशांचा तीन प्रकारे वापर केला पाहिजे. जर कोणी व्यक्ती श्रीमंत झाली, तर त्याने पैसे दान करावेत. जर त्याने दान केले नाही, तर त्याची संपत्ती नष्ट होते. सनातन शास्त्रात, पैसा स्वत:साठी व कुटुंबासाठी खर्च करावा. त्यानंतर उरलेले पैसे दान करावेत, असे सांगितले आहे. कंजूष होऊन संपत्ती जमा केली, तर त्या संपत्तीचा नाश निश्चित असतो. जर एखाद्या व्यक्तीने पैशाची बचत करण्याबरोबरच दान केले, तर त्याला देवाचा आशीर्वाद मिळू शकतो. त्याला सर्व प्रकारची सुखे मृत्युलोकातच मिळू शकतात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)