Chanakya Niti : आचार्य चाणक्य ही एक महान व्यक्ती होती. अनेक जण त्यांच्या नीतीचं अनुकरण करतात. ‘चाणक्य नीती’मध्ये मनुष्याचं आयुष्य सोपं आणि यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसंच त्यांनी आपल्या नीतीमध्ये अशा लोकांचाही उल्लेख केला आहे की, जे लोक मृत्यूनंतर नरकात जातात. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
असं म्हणतात की मृत्यूनंतर व्यक्ती स्वर्गात जाते की नरकात, हे व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असतं. जर कर्म चांगले असेल, तर लोक मृत्यूनंतर स्वर्गात जातात आणि कर्म वाईट असेल, तर लोक मृत्यूनंतर नरकात जातात. आचार्य चाणक्य यांनीसुद्धा त्यांच्या नीतीमध्ये हेच सांगितलं आहे.
हेही वाचा : Relationship Tips : जोडीदारबरोबर असतानाही एकटेपणा जाणवतो, ‘ही’ असू शकतात कारणे
- चाणक्य यांच्या मते, अतिलोभ करणारी व्यक्ती कुणाचीही होऊ शकत नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी असे लोक अनेकदा दुसऱ्यांचं वाईट करतात आणि त्यामुळे असे लोक मृत्यूनंतर नरकात जातात.
- चाणक्य सांगतात की, जे लोक कधीही इतरांचा चांगला विचार करीत नाहीत, मोठ्यांचा अपमान करतात, आई-वडिलांचं मन दुखावतात, असे लोक मृत्यूनंतर नरकात जातात.
- चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, महिलांचा अपमान करणारे, मुलींविषयी वाईट विचार करणारे आणि गरीब लोकांचे शोषण करणारे लोक नेहमी नरकात जातात.
- जे लोक त्यांच्या बोलण्यातून आणि कर्मांतून नेहमी इतरांना मानसिक आणि शारीरिक त्रास देतात; अशा लोकांना मृत्यूनंतर नरकात जावं लागतं.
- चाणक्य सांगतात की, चांगलं कर्म करा, आपली जबाबदारी पूर्ण करा, क्रोध, लोभ व निंदा करू नका आणि कधीही कटू शब्द बोलू नका, तरच स्वर्गात स्थान मिळेल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)