Chanakya Niti Tips : आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीचे आचरण- वर्तणूक यांचा खूप गांभीर्याने अभ्यास केला आहे आणि त्यानंतर आपल्या ‘चाणक्य नीती’मध्ये अशी कित्येक सूत्रे सांगितली आहेत; जी स्वीकारून व्यक्तीच्या कित्येक समस्यांना तोंड दिले जाऊ शकते. आपल्या नीतीशास्त्रामध्ये त्यांनी अशा तीन परिस्थितींबाबत सांगितले आहे; ज्यामध्ये व्यक्तीने कोणालाही उत्तर देऊ नये, वचन देऊ नये व कोणताही निर्णय घेऊ नये; अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
आनंदी असताना देऊ नका वचन
आचार्य चाणक्यांच्या मतानुसार, जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा कोणतेही वचन देऊ नका; अन्यथा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. कारण- जास्त आनंदी असलेल्या व्यक्ती कधी कधी असे वचन देऊन बसतात; जे त्या पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे ‘चाणक्य नीती’मध्ये सांगितले आहे की, वचन नेहमी विचार करून द्यावे.
हेही वाचा – चाणक्य निती : अशा पुरुषांकडे आकर्षित होतात महिला! कसा असावा जोडीदार? जाणून घ्या
रागामध्ये कोणालाही देऊ नका उत्तर
व्हा तुम्ही रागात असता तेव्हा कोणालाही उत्तर देऊ नका. कारण- रागाच्या भरात तुम्ही स्वत:वरील ताबा गमावता. मग अशा वेळी कधी कधी आपण अशा गोष्टी बोलून जातो; ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखवू शकते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा आणि अशी वेळ टाळण्याचा प्रयत्न करा.
दु:खी असताना कधीही घेऊ नका निर्णय
दु:खात असताना कोणताही निर्णय घेऊ नये. कारण- अशा स्थितीमध्ये महत्त्वाचा निर्णयदेखील चुकीचा ठरू शकतो; ज्यामुळे भविष्यात एखाद्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ‘चाणक्य नीती’नुसार दु:खी असताना भावनावेगात नव्हे, तर बुद्धीचा वापर करून निर्णय घेतला पाहिजे.